
सोलापूर : फोटो का मागितला, अशी विचारणा केल्याने सातजणांनी पट्ट्याने व लाथाबुक्क्यांनी चौघांना मारहाण केली. यात एकजण जखमी झाला. मंगळवारी (ता. १) सायंकाळी साडेसातच्या सुमारास सात रस्ता चौक परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी त्या सातजणांविरुद्ध सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.