
पंढरपूर : जातीवाचक अवहेलना करून लग्नास नकार दिल्याने तरुणीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना गादेगाव (ता. पंढरपूर) येथे रविवारी (ता. ६) दुपारी घडली. याप्रकरणी पंढरपूर ग्रामीण पोलिस ठाण्यात स्वाती नारायण साळुंखे या महिलेने फिर्याद दिली आहे. याप्रकरणी कुलदीप सिद्धनाथ बागल, सिद्धनाथ बागल यांच्यासह कुलदीपची आई आणि भाऊ अशा चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.