सोलापूर : प्रेमविवाह केल्याने हुंडा मिळाला नसल्याच्या कारणावरून विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह चौघांविरुद्ध फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. बसलिंगप्पा जेऊरे, सासू उमाबाई जेऊरे, दीर हृषीकेश जेऊरे, पतीचा मामा मल्लिनाथ (सर्व रा. फुलवाडी, अणदूर, जि. धाराशिव) यांचा गुन्हा दाखल झालेल्यांत समावेश आहे.