दामाजीचे अध्यक्षपदी परिचारक समर्थक शिवानंद पाटील उपाध्यक्षपदी तानाजी खरात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवानंद पाटील आणि तानाजी खरात

दामाजीचे अध्यक्षपदी परिचारक समर्थक शिवानंद पाटील उपाध्यक्षपदी तानाजी खरात

मंगळवेढा : श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना अध्यक्षपदी समविचारी गटातील परिचारक समर्थक शिवानंद पाटील यांची तर उपाध्यक्षपदी तानाजी खरात यांची बिनरोध निवड करण्यात आली. नुकत्याच झालेल्या श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपचे मा. आमदार प्रशांत परिचारक यांच्या समर्थकांनी व राष्ट्रवादीचे भगीरथ भालके यांच्या समर्थकांनी एकत्र येत समविचारी पॅनलच्या माध्यमातून सत्ताधारी आ. समाधान आवताडे यांच्या गटाला आव्हान दिले.

आ अवताडे गटाने निवडणुकीपूर्वी इतर मागासवर्गीय प्रवर्गाची एक जागा बिनविरोध केली होती. संस्था मतदारसंघातून सिद्धेश्वर आवताडे विजयी झाले.उर्वरित 19 जागा मोठ्या फरकाने समविचारी गटाने जिंकल्या होत्या. दामाजीच्या निकालाची राज्यभर चर्चा झाली या निवडणुकीच्या निकालाची भाजप नेतृत्वानी देखील दखल घेतली.या आज निवडणूक निर्णय अधिकारी अप्पासाहेब समिंदर यांच्या अध्यक्षतेखाली कारखाना कार्यस्थळावर अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी बैठक आयोजित करण्यात आले त्यामध्ये अध्यक्षपदासाठी शिवानंद पाटील यांनी तर उपाध्यक्ष पदासाठी तानाजी खरात यांनी अर्ज दाखल केले दोघेही बिनविरोध निवडून आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केले.

अध्यक्ष शिवानंद पाटील हे लिंगायत समाजातील एक प्रभावी व्यक्तिमत्व असल्याने साखर कारखानदारीत अग्रेसर असलेल्या परिचारक परिवाराचा देखील दामाजी कारखाना चालवण्यासाठी त्यांना मार्गदर्शन मिळणार आहे.दामाजी कारखान्यांमध्ये यापूर्वी संचालक म्हणून प्रभावी काम केल्यामुळे त्याच्या यापूर्वीच्या कामाचा त्यांना आता फायदा होणार आहे.उपाध्यक्ष तानाजी खरात हे धनगर समाजातील प्रभावी व्यक्तिमत्व असून नुकत्याच झालेल्या कारखान्या निवडणुकीत ते सर्वाधिक मतांनी विजयी झाले. कारखाना प्रशासनावर त्यांचा मोठा वचक राहणार असल्याने शिवाय कारखान्याच्या सत्तांतरामध्ये त्यांनी निर्णायक योगदान दिल्यामुळे त्यांना उपाध्यक्ष पदाची संधी देण्यात आली. निवडीनंतर समर्थकांनी जल्लोष केला

यावेळी धनश्री परिवाराचे शिवाजीराव काळुंगे बळीराजा परिवाराचे दामोदर देशमुख जिजामाता परिवाराचे रामकृष्ण नागणे,अॅड नंदकुमार पवार,प्रकाश गायकवाड, रामचंद्र वाकडे,युन्नुश शेख,दत्तात्रय खडतरे,शशिकांत बुगडे,यादाप्पा माळी,चंद्रशेखर कौडूभैरी,अरूण किल्लेदार,मुरलीधर दत्तू गोपाळ भगरे गौरीशंकर बुरुकुल तानाजी खरात राजेंद्र पाटील दयानंद सोनगे भारत बेदरे रेवणसिद्ध लिगाडे,औदुंबर वाडदेकर,लता कोळेकर निर्मला काकडे बसवराज पाटील भिवा दौलतोडे पी.बी.पाटील महादेव लुगडे तानाजी कांबळे दिगंबर भाकरे,गौडाप्पा बिराजदार आधी सह शेतकरी सभासद मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित

Web Title: Shri Sant Damaji Cooperative Sugar Factory President Shivanand Patil

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..