समाधान आवताडे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा; जगताप

श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना : 29 कोटी रुपयांचा गैर व्यवहार
Shri Sant Damaji Sugar Factory fraud File a criminal case against Samadhan Avtade Ajit Jagtap solapur
Shri Sant Damaji Sugar Factory fraud File a criminal case against Samadhan Avtade Ajit Jagtap solapur sakal media

मंगळवेढा : श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रारूप यादीच्या प्रसिद्धीकरणानंतर विद्यमान अध्यक्ष व संचालक मंडळाने 90 हजार 670 क्विंटल साखर पोत्याची परस्पर साखर विक्री करून सुमारे 29 कोटी रुपयांचा गैर व्यवहार केल्याप्रकरणी विशेष लेखापरीक्षक वर्ग-1 जी वी निकाळजे यांनी केलेल्या चौकशी अहवालामध्ये साखर गोडाउन मध्ये तफावत आढळून आल्याने कारखान्याचे अध्यक्ष आ. समाधान आवताडे व संचालक मंडळावर फौजदारी गुन्हा दाखल करून ऊस नियंत्रण आदेश 1966 मधील तरतुदीनुसार केलेल्या अपहाराची रक्कम वसूल करून कारवाई करण्याची मागणी जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य अजित जगताप यांनी साखर आयुक्त पुणे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली. निवडणुकीचा कार्यक्रम प्रसिद्ध होण्यापूर्वीच आरोप-प्रत्यारोपांचे फटाके उडू लागले.

याबाबत साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की श्री संत दामाजी साखर कारखाना हा एकमेव सहकारी साखर कारखाना असून सदरच्या कारखान्यांमध्ये विद्यमान चेअरमन व संचालक मंडळाने गेल्या सहा वर्षांमध्ये मनमानी कारभार करून आणि गैरव्यवहार केले आहेत त्यामुळे सभासद व कामगार वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे याबाबत कारखान्याच्या काही सभासदांनी साखर संचालक कडे केलेल्या तक्रारीनुसार विशेष लेखापरीक्षक वर्ग-1 चे जी.व्ही निकाळजे यांनी कारखाना स्थळावर भेट देऊन कारखान्याची सर्व गोडाऊन तपासणी करीत दिनांक 6 मे 2019 रोजी प्रादेशिक सहसंचालक आकडे कारखान्याचे चेअरमन व संचालक मंडळ यांच्यावर गंभीर दोष देत तो चौकशी अहवाल सादर केला त्यामध्ये साखर साठ्याच्या तपासणीमध्ये 90 हजार 670 क्विंटल ची तफावत आढळून आली असून एमएससी बँकेची परवानगी न घेता साखरेची परस्पर विक्री करून 29 कोटी कोटीची रक्कम भरलेली आहे .

अथवा इतर कोणत्या कारणासाठी वापरले याचा तपशील कारखान्याकडून दिला नाही तसेच कारखान्याचे शासकीय ताळेबंद पत्रक व नफा तोटा पत्रक संशयास्पद आहेत तसेच ऊस उत्पादकांची एफआरपी तत्कालीन नियमानुसार दिली नाही कर्मचाऱ्यांचा पगार प्रॉव्हिडंट फंडाची रक्कम एम एस सी बँकेची रक्कम भरलेली नाही तसेच काही कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युईटी व फायनल रक्कम दिली नाही 2018 ते 21 या कालावधीत साखर संचालकाची पूर्व परवानगी व मंजुरी न घेता मनमानी पद्धतीने भंगारविक्री करून त्या रकमेचा हिशोब ठेवला नसल्याचे चौकशी अहवालात म्हटले आहे त्यामुळे कारखान्यावर मनमानी पद्धतीने कारभार पैशाची उधळपट्टी करून 200 कोटीचे कर्ज केले आहे विशेष लेखापरीक्षक यांनी साखर साठा व इतर बाबींचा चौकशी अहवाल देऊनही त्यावर अद्याप कारवाई झाली नाही कोरोनामुळे संचालक मंडळाला मुदत मिळाली आहे.

चेअरमन व संचालक मंडळ यांनी बेकायदेशीरपणे कामकाज करून सभासद,कर्मचारी यांची फसवणूक केली आहे तसेच लेखा परीक्षक यांनी केलेल्या चौकशी अहवालानुसार साखर गोडाऊन मध्ये तफावत आढळून आल्याने सहकार कायदा ऊस नियंत्रण 1966मधील तरतुदीनुसार चेअरमन आ समाधान आवताडे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून अपहाराची रक्कम वसूल करून सभासदांना न्याय देण्याची मागणी जगताप यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,सहकार मंत्री सचिव सहकार विभाग,जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी नुकतीच प्रारुप यादी प्रसिद्ध करण्यात आली या यादीमध्ये सभासद वगळल्या वरून आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच हा जुन्या लेखापरीक्षण अहवालातील त्रुटी उकरून जगताप यांनी निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच रंगत आणली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com