
पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी श्री विठ्ठल मंदिर परिसरात कॉरिडॉर तयार केला जाणार आहे. या संदर्भात आत्तापर्यंत बाधित लोकांशी आम्ही चर्चा केली आहे. अजूनही चर्चा सुरू आहे. कॉरिडॉर होणार की नाही? यावर आता कुठलीही चर्चा केली जाणार नाही, तर कॉरिडॉर हा होणारच आहे, अशा शब्दात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आज ठणकावून सांगितले.