शिंदेवाडीचा शेतकरीपुत्र शुभम जाधव UPSC परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत प्रथम श्रेणीत यश; मिळवली 445 वी रँक
शुभम जाधव
शुभम जाधव sakal
Updated on

नातेपुते (सोलापूर) : शिंदेवाडी ता. माळशिरस येथील शुभम पांडुरंग जाधव याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत प्रथम श्रेणीत यश मिळवले असून त्यांची 445 रँक आहे.

शुभम पांडुरंग जाधव हा शेतकरी कुटुंबातील तरुण असून त्याचा जन्म 1995 साली झाला आहे. त्याचे प्राथमिक शिक्षण शिंदेवाडी व माळीनगर ता. माळशिरस येथे झाले आहे. इयत्ता अकरावी व बारावी हडपसर येथील साधना महाविद्यालयात झाले. पुणे येथील फर्ग्युसन कॉलेजमधून अर्थशास्त्रांची पदवी घेतली आहे. इंदिरा गांधी ओपन यूनिवर्सिटी मधून राज्यशास्त्र विषयात एम ए केले आहे. तो नेट परीक्षा उत्तीर्ण आहे.

शुभम जाधव
मोठी बातमी! सात ऑक्टोबरपासून राज्यातील मंदिरे उघडणार

पुणे येथील ज्ञान प्रबोधिनी व युनिक अकॅडमीचे त्याला विशेष मार्गदर्शन लाभले आहे. आईवडिलांच्या बरोबरच शुभमला त्याचा आतेभाऊ अमोल क्षीरसागर यांचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन लाभले आहे.

त्यांचा हा पाचवा प्रयत्न व चौथी मुलाखत होती. तो त्याच्या आयुष्यात स्वामी विवेकानंद, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा व युवकमित्र बंडातात्या कराडकर यांना आदर्श मानतो. त्यांचे आजोबा वै. बाबुराव जाधव हे कीर्तनकार व पैलवान होते. त्यांच्या कुटुंबास वारकरी संप्रदायाचा वारसा आहे. प्रशासकीय सेवेत जायचे हे त्याचे शालेय जीवनापासूनचे ध्येय होते. शुभमच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे‌.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Zero Tolerance: Maharashtra IMA Refuses to Support Doctors Implicated in NEET Scam
Sugarcane Farmers Demand Immediate Clearance of ₹130 Crore Pending Bills
Agricultural Department Cracks Down on Seed Racket in Akkalkot
25-Year-Old Social Media Creator Dies by Suicide in Mangalvedha
Marathi News Esakal
www.esakal.com