Siddheshwar Factory : कारखान्याची चिमणी पाडण्यात भाजपचा हात? काडादींच्या आरोपांना थोबडेंचं सडेतोड उत्तर

चिमणी पडल्यानंतर गाळपाविना सिद्धेश्‍वर कारखान्याचे पंधराशे कोटी रुपयांचे नुकसान होईल, असे सांगितले जात आहे.
Siddheshwar Sugar Factory
Siddheshwar Sugar Factoryesakal
Summary

धर्मराज काडादी यांची बेकायदेशीर कार्यपद्धती व मनमानी कारभार यामुळे सिद्धेश्वर कारखान्याला वाईट दिवस आले आहेत.

सोलापूर : श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची (Siddheshwar Cooperative Sugar Factory) को-जनरेशनची अनधिकृत चिमणी पडल्याने साखर कारखाना बंद पडणार असल्याची शेतकऱ्यांची व सभासदांची दिशाभूल मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी करत आहेत.

३० जूनपर्यंत उपलब्ध ४० कोटी करून द्या, आगामी गाळप हंगाम काय, सहवीज निर्मितीसह कायम कारखाना चालवून दाखवतो, असे आव्हान माजी तज्ज्ञ संचालक संजय थोबडे यांनी पत्रकार परिषदेत दिले.

Siddheshwar Sugar Factory
Devendra Fadnavis : कोणत्याही परिस्थितीत साताऱ्यात भाजपचाच खासदार हवा; NCP च्या बालेकिल्ल्यातून फडणवीसांचा आदेश

काडादी खापर फोडत असलेल्या आमदारद्वय देशमुख व भाजपचा (BJP) चिमणी पाडकामाशी काहीएक संबंध नसल्याचे स्पष्ट करत विनाकारण कोणावर तरी खापर फोडण्याचे काम श्री. काडादी करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

चिमणी पडल्यानंतर गाळपाविना सिद्धेश्‍वर कारखान्याचे पंधराशे कोटी रुपयांचे नुकसान होईल, असे सांगितले जात आहे. पाचशे कोटीमध्ये सिद्धेश्वर कारखाना आहे, त्या स्थितीसारखा नविन पद्धतीने चालू करून दाखवू शकतो.साखरेची विक्री लवकर न केल्याने दोनशे कोटीचे नुकसान झाले आहे. तर कारखान्यावर एक हजार कोटीचे कर्ज आहे. याबाबत त्यांनी खुलासा करावा.

Siddheshwar Sugar Factory
माता न तू वैरणी! अनैतिक संबंधाची माहिती समजताच आईनं पोटच्या पोराचा केला खून; हैवानी कृत्यानं खळबळ

शिवाय मागील हंगामात अर्कशाळेचे विस्तारीकरण चालू करण्यासाठी २२ कोटी खर्चून प्राज कंपनीची मशिनरी मागविली. सोलापूर महापालिकेने या विस्तारीकरणाला परवानगी नाकारली. तेव्हा काम बंद पडले व प्राज कंपनीचे कर्मचारी निघून गेले या नुकसानीला जबाबदार कोण? एवढं सगळं शून्य व्यवहार सरळ काही असताना, सिद्धेश्वर कारखाना आदर्शवत चालतो हा दावा ते कसे करतात? असा प्रश्न श्री. थोबडे यांनी केला आहे.

Siddheshwar Sugar Factory
PM मोदींना देशाची तर सोनिया गांधी, शरद पवारांना स्वतःच्या मुलाबाळांची चिंता; बावनकुळेंचा विरोधकांवर निशाणा

धर्मराज काडादी हे बेकायदेशीर व मनमानी कारभार करतात, त्यांचा स्वभाव हेकट आहे. म्हणूनच त्यांच्या प्रत्येक उद्योग व्यवसायात, त्यांच्या संस्थांना मोठा दंड, तोटा सहन करावा लागत आहे. गेल्या हंगामातील शेतकऱ्यांचे पैसे मिळाले नाहीत. सहा महिन्यांपासून कामगारांचा पगार नाही. कारखाना बंद होण्याच्या स्थितीत असल्यामुळे खापर कोणावर तरी फोडायचे, भारतीय जनता पार्टीवर आणि त्यांच्या लोकप्रतिनिधीवर काडादी खापर फोडत आहेत.

आमदार विजय देशमुख व आमदार सुभाष देशमुख यांनी या लढ्यात आम्हाला कोणतीही मदत केली नाही असे थोबडे म्हणाले.आमदार प्रणिती शिंदे यांनी या प्रकरणात उडी घेत चिमणी कायदेशीर आहे, शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे असा कांगावा करून राजकीय हेतू साध्य करण्यासाठी बेकायदेशीर वागणाऱ्या काडादींना पाठीशी घालत आहेत.

Siddheshwar Sugar Factory
Koyna : मुख्यमंत्री शिंदेंच्या गावालगत मोठी दुर्घटना; पूल कोसळून तीन जण गंभीर जखमी, अपघाताला जबाबदार कोण?

धर्मराज काडादी यांची बेकायदेशीर कार्यपद्धती व मनमानी कारभार यामुळे सिद्धेश्वर कारखान्याला वाईट दिवस आले आहेत. आगामी निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीने आपल्याला उमेदवारी दिल्यास काडादी यांच्या विरोधात उभे राहू शिवाय शहर मध्यमधून आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधातही निवडणूक लढण्यासाठी सज्ज आहोत असे संजय थोबडे म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com