
सोलापूर : हा आर्थिक अपहाराचा खटला नाही. प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे-माने यांचा प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर यांना छळण्याचा कोणताही उद्देश नव्हता. डॉक्टरांची सुसाईड नोट, त्यावरील स्वाक्षरी संशयास्पद आहे. त्यामुळे त्यांना जामीन मिळावा, असा युक्तिवाद त्यांचे वकील ॲड. प्रशांत नवगिरे यांनी केला. तर मुसळे- माने यांनी डॉ. वळसंगकर यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे सकृतदर्शनी दिसून येते. त्यामुळे त्यांना जामीन दिल्यास त्याचा समाजात चुकीचा संदेश जाईल, असे सांगत जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रदीपसिंह रजपूत यांनी जामिनास विरोध केला. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर निर्णयासाठी बुधवारची (ता. २५) तारीख दिली.