
राजकुमार शहा
मोहोळ : मंदिराच्या प्रवेशद्वाराचे व गाभाऱ्याचे कुलूप तोडून आत प्रवेश करून अज्ञात चोरट्याने देवाचे एक लाख 60 हजाराचे चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना पोफळी (पांडवाची) ता मोहोळ येथे ता 16 ते 17 जुलै दरम्यान सकाळी 7.30 पूर्वी घडली. या प्रकरणी मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.