esakal | पाण्यासाठी हे आमदार सरकारवर आणणार दबाव 

बोलून बातमी शोधा

Sina and Bhogavati to join water struggle committee

मोहोळ तालुक्‍यातील नरखेड येथील क्रांती लॉन्समध्ये सीना- भोगावती जोडकालवा पाणी संघर्ष समितीतर्फे पाणी परिषदेचे आयोजन केले होते. त्या वेळी ते बोलत होते. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे अध्यक्षस्थानी होते.

पाण्यासाठी हे आमदार सरकारवर आणणार दबाव 
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वाळूज (सोलापूर) : सीना- भोगावती जोडकालव्याचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी मोहोळ, माढा, बार्शी व उत्तर सोलारातील नेते एकवटले आहेत. सरकारवर दवाब आणणार आहेत. मोहोळ, माढा, बार्शी व उत्तर सोलापूर तालुक्‍यातील जनतेच्या पिण्याच्या पाण्यासह 40 हजार हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली येण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा सीना- भोगावती जोडकालव्याचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी सरकारस्तरावर सातत्याने प्रयत्न करणार असून या प्रस्तावित कामाचे पुन्हा फेर सर्वेक्षण करण्यास सरकारला भाग पाडू, असे प्रतिपादन आमदार यशवंत माने यांनी केले. 
मोहोळ तालुक्‍यातील नरखेड येथील क्रांती लॉन्समध्ये सीना- भोगावती जोडकालवा पाणी संघर्ष समितीतर्फे पाणी परिषदेचे आयोजन केले होते. त्या वेळी ते बोलत होते. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे अध्यक्षस्थानी होते. या वेळी माढ्याचे आमदार बबनराव शिंदे, मोहोळचे आमदार यशवंत माने, माजी आमदार राजन पाटील, राजन जाधव, पंचायत समितीच्या सभापती रत्नमाला पोतदार, निरंजन भूमकर, प्रकाश चवरे, जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील, वैभव पिसाळ, डॉ. संदेश कादे, सुशांत कादे, मकरंद निंबाळकर, सुहास पाटील, विजय कादे आदी उपस्थित होते. 
आमदार शिंदे म्हणाले, भविष्यात पाणीटंचाईपासून बचाव करायचा असेल तर आतापासूनच पाण्याचा प्रत्येक थेंब साठविणे गरजेचे आहे. पावसाळ्यात वाहून जणारे पाणी अडवून त्याचा साठा केल्यास इतर काळात पाणीटंचाई भासणार नाही. सीना-भोगावती जोडकालव्याच्या प्रश्‍नासाठी संघर्ष सुरु ठेवा, तुमच्या संघर्षाला आमचीही साथ राहणार आहे. 
माजी आमदार राजन पाटील म्हणाले, शेतकऱ्यांनी एकत्र येऊन लढा उभारल्याशिवाय सीना-भोगावती जोडकालव्याचा प्रश्‍न मार्गी लागणार नाही. या जोडकालव्याच्या संदर्भात पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याशी सोलापूर दौऱ्यावेळी चर्चा केली व सर्व माहिती दिली असता त्यांनी मंत्रालयात लवकरच बैठक घेण्याचे आश्‍वासन दिल्याचे त्यांनी सांगितले. बळीराम साठे म्हणाले, उत्तर सोलापूर व मोहोळ तालुक्‍यातील बराच भाग पाण्यासाठी होरपळत आहे. या भागाला पाणी मिळण्यासाठी सीना-भोगावती जोडकालव्याची योजना मार्गी लागणे आवश्‍यक आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून प्रस्ताव तयार करून ही योजना पूर्णत्वाला जाण्यासाठी प्रयत्न करू. कार्यक्रमासाठी जगन्नाथ कोल्हाळ, माजी सभापती नागेश साठे, विजयकुमार पोतदार, सुभाष डुरे-पाटील, बाळासाहेब डुरे-पाटील, बालाजी साठे, बालाजी पवार, उपसभापती जितेंद्र शीलवंत, पंडित ढवण, बबन दगडे, विजयकुमार पाटील, रामराजे कदम, विनोद पाटील, राजकुमार पाटील, अमोल कादे, तुकाराम पाटील, संदीप पाटील, अनिल देशमुख, हणमंत पोटरे, विष्णू शेळके, पाटबंधारे विभागाचे श्री. निंबाळकर, दिनकर पाटील, डी. आर. पाटील, रामकृष्ण लोखंडे यांच्यासह मोहोळ, उत्तर सोलापूर, बार्शी, माढा तालुक्‍यातील शेतकरी उपस्थित होते. सुशांत कादे यांनी प्रास्ताविक केले. ज्योती वाघमारे व गुरुराज कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. बालाजी साठे यांनी आभार मानले.