esakal | कोव्हिड केअर सेंटरमध्येच अपुरे मनुष्यबळ ! तीन डॉक्‍टरांवर "सिंहगड'ची जबाबदारी

बोलून बातमी शोधा

Doctor
कोव्हिड केअर सेंटरमध्येच अपुरे मनुष्यबळ ! तीन डॉक्‍टरांवर "सिंहगड'ची जबाबदारी
sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : शहरातील सौम्य लक्षणे असलेल्यांना कोव्हिड केअर सेंटरमध्ये ठेवले जात आहे. रुग्णांसाठी पाच कोव्हिड केअर सेंटर्स सुरू करण्यात आले असून त्यांची जबाबदारी अवघ्या 40 डॉक्‍टर, कर्मचाऱ्यांवरच आहे. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाची क्षमता सहाशे रुग्णांची तर विजयपूर रोडवरील म्हाडा कोव्हिड केअर सेंटरची क्षमता चारशेची आहे. मात्र, या दोन्ही ठिकाणी 17 पेक्षा कमी वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी असल्याची बाब समोर आली आहे.

कोरोना रुग्णांसाठी शहरात ऑक्‍सिजनचे तीन हजार 881 बेड असून 127 व्हेंटिलेटर बेड्‌स आहेत. आयसीयू बेड्‌स 308 आहेत. शहरात ऍक्‍टिव्ह रुग्णांची संख्या आता चार हजारांपर्यंत झाली आहे. सद्य:स्थितीत सिव्हिल हॉस्पिटलमधील 381 बेड्‌स, रेल्वे हॉस्पिटल, वाडिया हॉस्पिटल व बॉईज हॉस्पिटलमधील बेड्‌स हाउसफुल्ल होऊ लागले आहेत. त्यामुळे सौम्य लक्षणे असलेल्यांसह काही मध्यम लक्षणे असलेल्यांनाही कोव्हिड केअर सेंटरमध्येही पाठविण्यात येत आहेत.

हेही वाचा: स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ! मृताविरुद्धच गुन्हा दाखल

म्हाडा कोव्हिड केअर सेंटरची इमारत 13 मजली असून त्या ठिकाणी चारशे रुग्णांची क्षमता आहे. सध्या तिथे दोनशे रुग्ण आहेत. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील कोव्हिड केअर सेंटरमध्ये सहाशे रुग्णांची क्षमता असून सध्या तिथे तीनशेहून अधिक रुग्ण आहेत. पोलिस प्रशिक्षण केंद्र, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील कोव्हिड केअर सेंटरमध्येही रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. मात्र, धक्‍कादायक बाब म्हणजे, त्या ठिकाणी रुग्णांची देखभाल करण्यासाठी पुरेशा प्रमाणात मनुष्यबळच नाही. तीन शिफ्टमध्ये वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. डॉक्‍टर, वॉर्डबॉय, आरोग्यसेविका कमी असल्याने सर्व रुग्णांकडे लक्ष देता येत नसल्याचेही वास्तव समोर आले आहे.

"सिंहगड'मध्ये रात्री एकच डॉक्‍टर

सध्या सिंहगड कोव्हिड केअर सेंटर येथे सकाळ व दुपारच्या सत्रात प्रत्येकी दोन डॉक्‍टर तर रात्रीच्या वेळी केवळ एकच डॉक्‍टर कार्यरत असतो. दुसरीकडे वॉर्डबॉय केवळ एकच असून औषधे देण्यासाठीही एकच फार्मासिस्ट आहे. शहराची रुग्णसंख्या वाढत असल्याने शहरात आणखी कोव्हिड केअर सेंटर वाढविण्याच्या दृष्टीने प्रशासन नियोजन करीत आहे. मात्र, आहेत त्या कोव्हिड केअर सेंटरमध्ये मनुष्यबळाअभावी रुग्णांचे हाल होऊ लागले आहेत. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील कोव्हिड केअर सेंटरमधील काही रुग्ण म्हणाले, रात्रीच्या वेळी आमच्याकडे कोणीच येत नाही. ज्यांना त्रास होत असेल, त्यांनी डॉक्‍टरांकडे स्वत:हून यायला सांगतात. तर नाव न छापण्याच्या अटीवर डॉक्‍टरांनी सांगितले की, रुग्ण वाढत असतानाही मनुष्यबळ कमी पडत असल्याने सर्व रुग्णांकडे लक्ष देणे कठीण होत आहे.