

Leaders from Bharatiya Janata Party, Indian National Congress and other parties strategizing ahead of SIR campaign launch.
sakal
सोलापूर : राज्यात १ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या एसआयआर (मतदार यादी विशेष सखोल फेरतपासणी) प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला वेग दिला आहे. भाजपकडून प्रशिक्षण मेळाव्याचे आयोजन करत बूथनिहाय यंत्रणा सक्रिय करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने प्रमुख कार्यकर्त्यांची नियुक्ती व वरिष्ठांशी चर्चा सुरू केली असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष जिल्हास्तरावर आढावा बैठक घेणार आहे. दरम्यान, एमआयएमने स्वतंत्र यंत्रणा उभी करून कार्यालय सुरू केले असून, वॉर्ड व गावनिहाय पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून मतदार पडताळणी मोहिमेस मदत केली जाईल, असे काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आले.