या बसा, काय घेणार काढा की दूध हळद ? घरोघरी कोरोनामुळे बदलत आहेत आहाराचे प्रकार

halad dudh.jpg
halad dudh.jpg

कुर्डुवाडी (सोलापूर) : 'या बसा... काय घेणार काढा की दूध हळद... ' या प्रकारची वाक्‍ये आता अनेक ठिकाणी कानावर पडत आहेत. तर अनेकांच्या घरात आवळा, चवनप्राश, लिंबू, संत्री, मोसंबी यासारख्या पदार्थांचा दररोजच्या खाण्यामध्ये वापर वाढला आहे. 

हेही वाचाः सोलापूरच्या ग्रामीण भागात आज आढळले 285 नविन कोरोनाबाधित रुग्ण 

गेल्या काही महिन्यापासून कोरोना मुळे प्रतिकारशक्ती बाबत लोक जागरुक झाले आहेत. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काय खाल्ले पाहिजे कोणत्या पदार्थांचा उपयोग होतो याबाबत डॉक्‍टर व इतरांचे व्हिडिओ, पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या. प्रत्येकजण स्वतःची, कुटुंबाची व स्नेहींची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी जाणीवपूर्वक आग्रही असल्याचे दिसत आहेत. 

कोरोना संसर्ग पसरण्याच्या आधी घरी कोणी आले की चहा, कॉफी, दूध, थंडपेय याचा आग्रह केला जात असे. सध्या घरी आलेल्या स्नेहींना काढा, दुधहळद, लिंबू सरबत, आवळा सरबत घेण्याचा आग्रह केला जात असल्याचे दिसत आहे. तसेच घरात चवनप्राश, आवळ्याचे पदार्थ, लिंबू, संत्री, मोसंबी या सी जीवनसत्त्व असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश वाढला आहे. 

कोरोनाबद्दल जागरुकता वाढली 
सर्दी, खोकला, कफ होऊ नये यासाठी प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काढा, आवळा, लिंबू आदींचा चांगला उपयोग होतो. याबरोबरच सकाळी भरपूर जेवण व रात्री लवकर कमी जेवण केले पाहिजे. दिनचर्या व ऋतुचर्या योग्य असावी.

- डॉ सचिन गोडसे, श्री विश्वार्पण आयुर्वेद चिकित्सालय, कुर्डुवाडी. 

स्वागताचे पदार्थ बदलले 
घरी येणाऱ्यांना आम्ही शक्‍यतो गरम काढा, लिंबू सरबत किंवा आवळा सरबत देतो. 
- ऋतुजा पाटील, कुर्डुवाडी 

संपादनः प्रकाश सनपूरकर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com