
-संतोष पाटील
टेंभुर्णी : मोडनिंब येथील मार्केट यार्ड मधील पत्राशेड मध्ये तीन पानाचा जुगार खेळत असताना टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने छापा टाकून सहा जणांना पकडले असून त्यांच्याकडून सहा हजार रूपये व जुगाराचे साहित्य जप्त केले. ही कारवाई शनिवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास केली.