Shri Madheshwari Devis Chhabina Festival Celebrated
sakal
माढा - सहा तासांहून अधिक काळ श्री माढेश्वरी देवीचा छबिना उत्सव चालला असून, हजारो भाविक-भक्तांनी श्री माढेश्वरी देवीचे दर्शन घेत हत्ती या देवीच्या वाहनावरील उत्सव मूर्तीला भोगी केली. यात्रेमुळे श्री माढेश्वरी देवीचा मंदिर परिसर भाविक-भक्तांनी फुलून गेला आहे. मंगळवारी (ता. ७) व बुधवारी (ता. ८) यात्रा भरणार आहे. तुळजापूरच्या धर्तीवर माढयातील छबिना उत्सव असतो.