esakal | शेतकऱ्याची सहा लाखांची फसवणूक 
sakal

बोलून बातमी शोधा

Six lakh fraud of farmers in Mohol taluka
  • मोहोळ तालुक्‍यातील शेतकरी 
  • बजाज कंपनीचा अधिकारी असल्याचे सांगून केला व्यवहार 
  • तीन क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न, पण तीनही नंबर बंद आहेत 

शेतकऱ्याची सहा लाखांची फसवणूक 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मोहोळ : बजाज कंपनीचा अधिकारी असल्याचे सांगून तुमचे व्यवहार चांगले असल्याचे सांगितले. त्यामुळे तुमच्या शेतीच्या व्यवसायासाठी कर्ज मंजूर करून देतो असे सांगून तांबोळे (ता. मोहोळ) येथील शेतकऱ्याची तब्बल पाच लाख 91 हजार 438 रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली. 

बाळासाहेब अर्जुन चव्हाण (रा. तांबोळे) यांना 17 जून 2019 रोजी रीसेप त्यागी नावाच्या व्यक्तीने दूरध्वनीद्वारे बजाज फायनान्स ऑफिस लोहगाव पुणे येथून बोलत असल्याचे सांगत तुम्ही काढलेल्या कर्जाचे व्यवहार चांगले आहेत. त्यामुळे तुम्हाला बजाज फायनान्सकडून सहा लाख 78 हजार रुपयांचे कर्ज मंजूर झाले आहे; परंतु तुम्हाला त्यासाठी काही चार्जेस भरावे लागतील ते भरले तर तुम्हाला फायनान्स मंजूर होईल असे सांगितले. त्यानुसार त्यागी यांनी वेगवेगळ्या तीन क्रमांकावरून फोन करत त्याच्या खात्यात पैसे भरण्यास सांगितले. हे पैसे परत मिळणार असल्याने मागील सहा महिन्यांपासून बाळासाहेब चव्हाण यांनी वेगवेगळ्या तारखेस दोन लाख 32 हजार एक रुपये तसेच त्यानंतर 30 हजार 700 रुपये आणि तीन लाख 28 हजार 737 रुपये असे एकूण पाच लाख 91 हजार 438 रुपये चव्हाण यांच्याकडून त्यागी यांनी काढून घेतले. चव्हाण यांनी यासंदर्भात त्यागीला माझ्या कर्ज प्रकरणाची रक्कम व परतावा असे खात्यात भरा असे सांगितले. परंतु, त्यागीने कर्ज रक्कम व परतावा रक्कम भरलेली नाही. यासंदर्भात पूर्वीच्या तीन क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता हे तीनही नंबर बंद आहेत. त्यामुळे चव्हाण यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल केला.

loading image