
करमाळा : भाजपचे करमाळा शहराध्यक्ष जगदीश आगरवाल यांच्यावर हल्ला करण्यात आलेल्या संशयितांविरोधात करमाळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहा जणांना अटक करण्यात आली आहे. सोमवारी (ता. १४) त्यांच्या हॉटेलसमोर इंदापूर (जि. पुणे) येथील संशयितांनी मारहाण केली होती. त्यामध्ये सहाजणांना तत्काळ अटक करण्यात आली आहे. आगरवाल यांच्यावर पुणे येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती ठीक आहे.