
सोलापूर : चार दिवसांपूर्वी वंदे भारतमधून पुणे स्थानकावर धूर निघण्याची घटना ताजी असतानाच हसन- सोलापूर एक्स्प्रेसच्या चाकाजवळून धूर निघाल्याचे समोर आले आहे. कलबुर्गी जिल्ह्यातील शहाबाद तालुक्यातील मत्तूर गावाजवळ ही घटना सोमवारी (ता. २१) सकाळी सहाच्या सुमारास घडली.