Shravan Nag Panchami
Shravan Nag Panchamiesakal

बदला घेण्यासाठी साप खरंच डूख धरतात? सापाविषयी अनेक अंधश्रद्धा, जाणून घ्या श्रावणात सापाला का आहे महत्व

धर्मबरोबरच पयार्वरवणाच्या दृष्टीनेही नागाचे स्थान महत्त्वाचे आहे.
Summary

श्रावण महिन्यात नागाला देवत्व देत पूजन केले जात असले तरी एरव्ही वर्षभर साप घरात आढळल्यास सामान्यपणे मारले जाते.

सोलापूर : श्रावणात (Shravan) संपूर्ण महिनाभर नागदेवता म्हणून सर्प (Snake) पूजन केले जाते. मात्र, सापाला ना कोणी मित्र आहे, ना शत्रू. तो अन्न साखळीतील तो एक प्राणी आहे. त्याला मित्र म्हणून हाताळू नये किंवा शत्रू समजू मारू नये, असा सर्पअभ्यासकांचा दावा आहे. घरात साप आढळल्यास त्याला मारू नये, तज्ज्ञाकडून पकडून निसर्गाच्या सानिध्यात सोडावे.

नुकत्याच झालेल्या नागपंचमीच्या (Nag Panchami) सणानिमित्त सर्वत्र नागदेवतेचे पूजन करण्यात आले. संपूर्ण श्रावण महिन्यात सापाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात येते. विविध ठिकाणी यात्रा सुरू असतात. मात्र, एकीकडे श्रावण महिन्यात नागाला देवत्व देत पूजन केले जात असले तरी एरव्ही वर्षभर साप घरात आढळल्यास सामान्यपणे मारले जाते.

Shravan Nag Panchami
Hasan Mushrif : सुळकूड योजनेतून इचलकरंजीला पाणी दिल्यास रक्तपात होईल; मुश्रीफांचा कडक शब्दात इशारा, काय आहे वाद?

नागाबद्दल श्रद्धेपेक्षा अंधश्रद्धा अधिक

नागांचे पर्यायाने सर्पसृष्टीचे महत्त्व आपल्या पूर्वजांनाही ओळखले होते. किमान पाच ते सहा हजार वर्षापूर्वीदेखील नागपूजा होत असल्याचे प्राचीन नागमूर्तीवरून सिद्ध होते. धर्मबरोबरच पयार्वरवणाच्या दृष्टीनेही नागाचे स्थान महत्त्वाचे आहे. परंतु, यामध्ये श्रद्धेपेक्षा अंधश्रद्धाच जास्त आहेत.

लोककथा, कहाण्या, गूढकथा, भाकडकथा आणि शास्त्रीय माहितीविषयी अज्ञान या कारणांमुळे निरुपद्रवी सापाला शत्रू ठरवून मृत्यूदूत बनविले आहे. सापाविषयी अनेक अंधश्रद्धा प्रचलित आहेत. साप डूख धरतात. या समजूतीला काहीही शास्त्रीय आधार नाही.

Shravan Nag Panchami
Loksabha Election : शरद पवारांची मोठी खेळी, शाहू महाराजांना उतरवणार लोकसभेच्या रिंगणात? म्हणाले, जनतेच्या मनात..

सर्पदंश झाल्यास उपाय

  • सर्पदंश झालेल्या व्यक्तीला मानसिक धीर देणे, त्‍याच्या मनातील भीती दूर होणे गरजेचे आहे.

  • सर्प दंश झालेल्या व्यक्तीला शांत, हवेशीर ठिकाणी आणावे.

  • दंश झालेली जागा डेटॉल, किंवा स्वच्छ पाण्याने धुऊन काढावी

  • सर्पदंश झालेल्या जागेतून रक्तस्राव असेल तर वाहू द्यावा.

  • सर्प दंश झालेल्या अवयवाकडून हृदयाच्या दिशेने होणारा रक्‍तपुरवठा रोखण्यासाठी मध्यम दाबाने बांधावे.

  • शक्य तितक्या लवकरात लवकर रुग्‍णालयात द्यावे, वैद्यकीय उपचार सुरू करावेत.

Shravan Nag Panchami
Adampur Balumama : आदमापूर बाळूमामाच्या पूजेसाठी 'या' कुटुंबातील महिलांना मिळाला मान; High Court चा महत्त्वपूर्ण आदेश

सापांपासून मानवास अनेक फायदे असल्याने माणूस सापाला आपले दैवत, आपला मित्र मानतो. परंतु, शास्त्रीयदृष्ट्या पाहता साप हा निसर्गातील महत्त्वाचा घटक असून सापास मानवाच्या मैत्रीची गरज नसून तो त्याचे आयुष्य जगण्यास सक्षम आहे. त्यामुळे त्याला मित्र समजून हाताळणे हे चुकीचे आहे आणि शत्रू समजून मारणेही चुकीचेच आहे. ही गोष्ट ओळखून मानवाने सापांसोबत सहजीवन जगणे ही काळाची गरज आहे.

-राहुल शिंदे, सर्प अभ्यासक, सोलापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com