
Police arrest youth for molesting a minor girl after meeting her via Instagram
सोलापूर : इन्स्टाग्रामवर ओळख करून तुझ्यावर प्रेम असल्याचे सांगून एका तरुणाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. हा गुन्हा सदर बझार ठाण्याच्या हद्दीत घडला. तरुणाविरुद्ध ‘पोक्सो’ व ॲट्रॉसिटीअंतर्गतही गुन्हा दाखल झाला आहे. न्यायालयाने त्या तरुणास तीन दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे. रोहित घोडके असे त्या संशयिताचे नाव आहे.