

Special Court Awards 20-Year Sentence in Social Media Assault Case
sakal
सोलापूर: अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी आहेरवाडी (ता. दक्षिण सोलापूर) येथील तरुणास विशेष न्यायाधीश जे. जे. मोहिते यांनी पोक्सो कायद्यांतर्गत २० वर्षे सक्त कारावासाची आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. राजकुमार सायबु खेत्री (वय २३) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे.