Solapur : चार गोशाळांद्वारे ५१ उत्पादनांची निर्मिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रकल्पांना चालना

Solapur : चार गोशाळांद्वारे ५१ उत्पादनांची निर्मिती

सोलापूर : प्राणी रक्षणाच्या कार्याच्या माध्यमातून येथील सुचित्रा गडद यांनी एकाचवेळी चार गोशाळा उभारून त्यांचे यशस्वी व्यवस्थापन केले आहे. भाकड व दुधाळ जनावरे सांभाळत असताना या गोशाळेची अनेक उत्पादने त्यांनी तयार करुन अर्थकारणाला चालना दिली आहे.

सुचित्रा गडद या सुरवातीला मनेका गांधी यांच्या प्राणीरक्षण मोहिमेत काम करत असत. ते कार्य करत असताना शहरात गाईच्या दुधाची कमतरता आहे, हे लक्षात घेऊन जकराया साखर कारखाना व भंडारकवठे भागातून त्यांनी मेंढपाळांकडून काही गायी विकत घेतल्या. कारखान्याच्या परिसरातील पडिक जमिनीवर हिरवा चारा व नंतर साखर कारखान्यातून मिळणारे उसाचे वाढे खाद्य म्हणून उपलब्ध करुन घेतले.

हेही वाचा: तलाठ्यांचे आंदोलन : जगतापांची बदली होईपर्यंत 'काम बंद'!

त्यामुळे या जनावरांच्या चाऱ्यांचा प्रश्‍न सुटला. आचेगाव व एसआरपी कॅम्प भागात त्यांनी दोन गोशाळा सुरु केल्या. भाकड जनावरे, कत्तलखान्याकडे जाणारी जनावरे त्यांनी दुधाळ जनावरांसोबत सांभाळली. नंतर त्यांनी राष्ट्रीय कामधेनू आयोगाशी संपर्क साधून गोउत्पादनांच्या कामांना सुरवात केली. पणत्या, गणेशमूर्ती, खते, किटकनाशके, पंचगव्य उत्पादने व औषधांची निर्मिती केली. गाईचे शेण त्यांनी सुरवातीला दोन रुपये किलो दराने विकले. आता शेणाची किंमत १५ रुपये किलोपर्यंत गेली आहे. या पध्दतीने त्यांनी गोशाळा उत्पादनाची उलाढाल लाखो रुपयांत पोहोचवली आहे. तसेच दूध व इतर दुग्धजन्य उत्पादनेदेखील मोठ्या प्रमाणात होत आहेत.

Web Title: 

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top