

Solapur Land Scam: Protest Demands SIT Probe Into 1,500 Plots
esakal
सोलापूर : शहरातील ५२ नगरांमध्ये बनावट आधारकार्ड, स्टॅम्पवर बनावट नोटरी, फोटोशॉपद्वारे खरेदीदस्त बनावट बनवून आणि शासकीय यंत्रणेच्या कथित संगनमताने संघटित रॅकेटद्वारे दीड हजारांहून प्लॉट बळकावले आहेत. याची ‘एसआयटी’द्वारे चौकशी करावी, रॅकेटमधील सगळ्यांवर ‘मोका’अंतर्गत कारवाई करावी, या मागणीसाठी बुधवारी (ता. २५) जिल्हा परिषदेच्या पूनम गेटसमोर हिंदु जनजागृती समितीने आंदोलन केले.