Solapur : 18 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत परिचारक गटाला विस्तारण्याची संधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Solapur

Solapur : 18 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत परिचारक गटाला विस्तारण्याची संधी

मंगळवेढा : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी तालुक्यात 18 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा आखाडा तापू लागला. याच निवडणुकीतून स्थानिक स्वराज्य संस्था व आगामी विधानसभेची राजकीय गणिताची सुरुवात ठरणार असल्याने या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ही परिचारक गटाला विस्तारण्याची संधी दामाजी कारखान्याचे अध्यक्ष शिवानंद पाटील यांच्यामुळे मिळणार आहे.

मतदारसंघ पुनर्रचनेनंतर सन 2009 पासून स्व. भालके यांना आमदार होण्याची संधी मिळाली.मात्र 2014 व 2019 या दोन निवडणुकीत परिचारक चुलत्या पुतण्याचा पराभव झाला. मात्र या पराभवातून सावध होत परिचारक गटाने मंगळवेढ्यात गट वाढवण्यासाठी म्हणावे तितके प्रयत्न केले.

नाहीत किंबहुना त्या ताकतीचा सक्षम नेता तालुक्यात त्यांच्या दृष्टीने उपलब्ध झाला नाही मात्र चार महिन्यापूर्वी झालेल्या दामाजी कारखान्याच्या निवडणुकीत भालके गटाशी हातमिळवणी करत शिवानंद पाटील यांनी समविचारी गटाची स्थापना करून दामाजीचा आखाडा गाजवला. एकतर्फी विजय संपादन केल्यानंतर शिवानंद पाटील यांनी कारखान्याचा पदभार घेतल्यापासून ऊस उत्पादकाची थकीत बिले, कर्मचाऱ्यांचे पगार व कारखान्याचे व्यवस्थापन प्रशांत परिचारक व उमेश परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली चांगल्या पद्धतीने सुरू केले. त्यामुळे परिचारक गटाला तालुक्यामध्ये गट हाताळण्यासाठी सक्षम चेहरा उपलब्ध झाला राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता 2024 ची विधानसभा निवडणूक देखील तितक्याच ताकतीची होणार असल्याची चिन्हे दिसू लागली.

अशा परिस्थितीत तालुक्यात परिचारक गटाला ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने विस्तारण्याची संधी मिळाली त्यामुळे त्यामध्ये जास्त खुद्द दामाजी कारखान्याचे अध्यक्ष शिवानंद पाटील यांच्या तळसंगी गावची निवडणूक या टप्प्यामध्ये आहे त्यांना मारापुर, डोंगरगाव,येड्राव, बावची,पौट, फटेवाडी,पाठखळ,खोमनाळ, गोणेवाडी,सोड्डी,गुंजेगाव,मारोळी या ग्रामपंचायतीमध्ये दामाजी कारखान्याच्या निवडणुकीत राबवलेला समविचारी गटाचा पॅटर्न राबवून या ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळवण्याची संधी उपलब्ध असल्याची चर्चा या ग्रामीण भागात सुरू झाली.

त्या दृष्टीने या गावातील कार्यकर्त्याला ताकद देण्यात दृष्टीने स्वतः परिचारक दामाजी कारखान्याचे अध्यक्ष शिवानंद पाटील हे कशा पद्धतीने यंत्रणा हाताळतात यावर या गटाचे भवितव्य अवलंबून आहे अजूनही ग्रामीण भागातील काही गावात भालके यांचा प्रभाव मतदारांमध्ये दिसून येतो मात्र गटबांधणीच्या दृष्टीने भगीरथ भालके व त्यांच्या पत्नी प्रणिता भालके कशा पद्धतीने मतदारांशी जवळीक साधतात यावर त्या गटाचे भविष्य अवलंबून आहे यातील बहुतांश ग्रामपंचायतीमध्ये सिद्धेश्वर आवताडे यांचा गटाचे अस्तित्व प्रभावीपणे नसले तरी हुकमाचे पान मात्र त्यांच्या हातात असल्याचे या निमित्ताने बोलले जात आहे.भालेवाडी, रहाटेवाडी ढवळस,या ठिकाणच्या निवडणुका देखील चुरशीच्या होणार आहेत.

राज्यात झालेल्या सत्ता बदलाचे परिणाम ग्रामीण जनतेच्या दैनंदिन जीवनाच्या प्रश्नावर झाले असून परतीच्या पावसाने केलेल्या पिकाची नुकसान भरपाई,वीज,बंद भोसे योजना,पीक विमा,रस्ते,ऑफलाईन शिधापत्रिकासह अनेक समस्या रखडल्यामुळे सत्ताधाय्राच्या विरोधामध्ये जनता मतपेटीतून उत्तर देऊ शकते असे असले तरी परिचारक व भालके गट कसे जुळवून घेतात यावर ग्रामपंचायतीतील सत्तेचे समीकरण ठरणार आहे.