सोलापूर : शहरातील 19 प्रभाग कोरोनामुक्‍त ! जिल्ह्यातील 34 महिला अन्‌ 97 पुरुषांवर उपचार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Solapur

सोलापूर : शहरातील 19 प्रभाग कोरोनामुक्‍त ! जिल्ह्यातील 34 महिला अन्‌ 97 पुरुषांवर उपचार

सोलापूर : जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लाट आटोक्‍यात आली असून शहर कोरोनामुक्‍तीच्या उंबरठ्यावर आहे. शहरातील 26 प्रभागांपैकी 19 प्रभाग कोरोनामुक्‍त झाले असून प्रभाग तीन, दहा, 11, 17, 20, 21 या प्रभागांमध्ये प्रत्येकी एक तर प्रभाग 24 मधील दोन रुग्ण उपचार घेत आहेत. दुसरीकडे ग्रामीणमध्ये ऍक्‍टिव्ह रुग्णसंख्या 124 आहे.

कोरोनाच्या दोन्ही लाटेत शहरातील 29 हजार 432 तर ग्रामीणमधील एक लाख 74 हजार 655 व्यक्‍तींना कोरोनाची बाधा झाली. त्यापैकी एक लाख 98 हजार 850 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या शहरातील पाच पुरुष आणि तीन महिलांवर उपचार सुरु आहेत. तर ग्रामीणमध्ये 93 पुरुष आणि 31 महिला उपचार घेत आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्‍यात मागील सहा दिवसांपासून एकही रुग्ण आढळला नसून हा तालुका अद्याप कोरोनामुक्‍तच आहे.

हेही वाचा: कोरोनानंतर शिक्षण विभागाची पहिल्यांदाच आज महाबैठक!

आज (बुधवारी) अक्‍कलकोट, मंगळवेढा, उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर या तालुक्‍यांमध्ये कोरोनाचा एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही. तर बार्शीत चार, करमाळ्यात पाच, माढ्यात तीन, माळशिरस तालुक्‍यात सात, मोहोळ, पंढरपूर तालुक्‍यात प्रत्येकी दोन, सांगोल्यात एक रुग्ण आढळला आहे. दिलासादायक बाब म्हणजे म्युकरमायकोसिसचा आज एकही नवीन रुग्ण आढळला नसून या आजाराचे पाच रुग्ण सध्या उपचार घेत आहेत.

loading image
go to top