

Solapur Water Supply Scheme Gets Approval for 1350 Crore Project to Ensure Daily Water Supply Across the City
sakal
सोलापूर : सोलापूर शहराच्या महत्त्वाकांक्षी १ हजार ३५० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेला राज्य शासनाच्या सुकाणू समितीने बुधवारी मंजुरी दिली. महापालिकेच्या एक हजार ४८३ कोटींच्या मूळ प्रस्तावात १३२ कोटींची कपात करून सुधारित आराखड्यास मान्यता देण्यात आली. जागतिक बँकेच्या वॉशिंग्टन मुख्यालयाच्या मान्यतेनंतर निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असून, तीन महिन्यांत तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून कामाचे आदेश दिले जातील, अशी माहिती आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिली.