
Solapur: ज्या वयात मुले बालवाडीत जातात त्या वयात श्लोक स्वप्नील आळंदने लॉन टेनिस सराव सुरु केला. सध्या इयत्ता चौथीत शिकणाऱ्या अवघ्या साडे नऊ वर्षांचा श्लोक आळंदने केवळ पाच वर्षात लॉन टेनिस खेळात तब्बल ४२ राज्य तसेच राष्ट्रीय विक्रम स्थापित केला आहे. लष्कर भागात राहणाऱ्या श्लोकने लॉन टेनिस सरावास सुरवात केली. श्लोकची आई मोनिका आळंद बास्केटबॉलच्या राज्य खेळाडू तर आईचे वडील मृत्यूंजय शेटरू राष्ट्रीय खेळाडू आहेत. त्याचे आजोबा सुनील आळंद हे योग प्रशिक्षक आहेत.