सोलापूर : आता विमानसेवा लवकरच सुरु होईल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MP Mahaswami

सोलापूर : आता विमानसेवा लवकरच सुरु होईल

सोलापूर : आता सोलापूरकरांना विमानसेवेची फार वेळ वाट पाहावी लागणार नाही. लवकरच १९ व २१ आसनी विमाने सुरु करण्याबाबत निर्णय होणार असल्याचे मत खासदार डॉ. जयसिध्देश्वर महास्वामी यांनी व्यक्त केले.

बुधवारी (ता. २९) एका सार्वजनिक कार्यक्रमात त्यांनी विमानसेवेबद्दल भाष्य केले. या कार्यक्रमात ऑल इंडिया बिल्डरअसोसिएशनचे महाराष्ट्र अध्यक्ष दत्ता मुळे यांनी विमानसेवेबद्दल विचारणा केली. आज सोलापुरात येऊन उद्योगांच्या संधी शोधण्याची व पाहणी करण्याची अनेक उद्योगपतींची इच्छा आहे. पण विमानसेवेअभावी ते येऊ शकत नाही. कारण त्यांना रस्ते मार्गाने प्रवासाचा इतका अधिकवेळ देणे शक्य होत नाही. त्यामुळे आता सोलापूरची विकासाची अडचण अधिकच वाढत चालली आहे. खासदार महास्वामी यांनी मनात आणले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बोलले तर पाच मिनिटात निर्णय होऊ शकतो असे त्यांनी सांगितले.

तेव्हा या मुद्द्यावर प्रतिसाद देताना खासदार महास्वामी म्हणाले, आता सोलापूरची विमानसेवा सुरु होण्यास कोणतीच अडचण नाही. याबाबत आपण लोकसभेत प्रश्न मांडला तसेच नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याशी चर्चा केली आहे. या स्थितीत अलाईन्स एअरच्या डॉर्नीअर २२८ ही १९ आसनी विमानसेवा तत्काळ सुरु केली जाऊ शकते असे त्यांनी सांगितले.

Web Title: Solapur Airline Start Soon Mp Mahaswami

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..