esakal | Solapur : पवारांच्या उपस्थितीत ८ ऑक्‍टोंबरला मेळावा
sakal

बोलून बातमी शोधा

 शरद पवार

पवारांच्या उपस्थितीत ८ ऑक्‍टोंबरला मेळावा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार हे ८ ऑक्‍टोंबर रोजी सोलापूरच्या दौऱ्यावर येत आहेत. पूर्वी ९ ऑक्‍टोबरला असलेला नियोजित दौरा आता एक दिवस आगोदर आला आहे. पक्षाध्यक्ष पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या मेळावा घेण्यासाठी सोलापुरातील हुतात्मा स्मृतिमंदिरचे नियोजन आहे.

जिल्हा परिषदेमध्ये विरोधी पक्ष नेते बळिराम साठे यांच्या कार्यालयात जिल्हाध्यक्ष साठे व कार्याध्यक्ष उमेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा कार्यकारिणीची बैठक झाली. त्यामध्ये पवार यांच्या दौऱ्यावर नियोजन करण्यात आले आहे. दौरा एक दिवस आगोदर आल्याने आज पुन्हा एकदा जिल्हाध्यक्ष साठे यांनी आपल्या कार्यालयात काही ठराविक पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. शहराध्यक्ष भारत जाधव व कार्याध्यक्ष संतोष पवार यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांच्या नियोजन बैठका सुरु आहेत.

loading image
go to top