सोलापूर - अक्‍कलकोट बसची तोडफोड; अज्ञाताचे कृत्य | Bus Damage | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोलापूर- अक्‍कलकोट बसची तोडफोड; अज्ञाताचे कृत्य

सोलापूर- अक्‍कलकोट बसची तोडफोड; अज्ञाताचे कृत्य

सोलापूर - एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु असतानादेखील अक्‍कलकोट आगाराची बस (क्र. एमएच 11 बीएल 9398) ही अक्‍कलकोट ते सोलापूर फेरी पूर्ण करुन परतीच्या प्रवासासाठी अक्‍कलकोटकडे निघाली होती. या बसवर अक्कलकोटजवळील गंगेवाडी येथे अनोळखी व्यक्तींनी लाकडी दांडक्‍याने एसटीच्या समोरील काचेवर जोरात मारुन काच फोडून पळून गेले आहेत. या घटनेची फिर्याद चालक सै. र. हिप्परगी व वाहक वि. व. मोरे यांनी तालुका पोलिस स्टेशनमध्ये दिली आहे.

जिथे रस्ता तिथे एसटी अशी ओळख असणाऱ्या लालपरीला मागील काही दिवसांपासून ब्रेक लागला आहे. एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी मागील आठ दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरु केले आहे. मागील काही दिवसांपासून एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण करावे या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. एसटीचे कर्मचारी संप मागे घेण्यास तयार नाहीत.

हेही वाचा: चंद्रभागा परिसर फुलू लागला! प्रशासनाने पुरवल्या सोयीसुविधा

संप आणखी किती दिवस सुरु राहणार?

एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणखी किती दिवस सुरु राहणार? प्रवाशांचे होणारे हाल कधी थांबणार? आठ दिवसापासून या प्रश्नांची उत्तरे कुणालाच मिळविता आली नाहीत. एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा आठवा दिवस आहे. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करा, या मागणीवर कर्मचारी अजूनही ठाम आहेत. तर न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही सुरु असल्याचे राज्य सरकारचे म्हणणे आहे. शुक्रवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास गंगेवाडी जवळच लाकडी दांडक्‍याने अनोळखी इसमाने मारुन पळून गेल्याची घटना घडली आहे.

सोलापूरमध्ये एसटीचे नुकसान

राज्यभर लाल परीला ब्रेक लागलेला असताना संपकरी कर्मचाऱ्यांनी कामावर परतावे असे आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले आहे. यात शुक्रवारी सकाळी अक्‍कलकोट आगाराची बस सोलापूरकडे यशस्वी प्रवाशांना सुखरुप घेवून आली. मात्र परतीच्या प्रवासासाठी जात असताना अनोळखी इसमाने हात दाखवून एसटी थांबवून लाकडी दांडक्‍याने मारुन एसटीचे नुकसान केले आहे. याविरुध्द अक्‍कलकोट पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आले असल्याची माहिती अधिका-यांनी दिली.

loading image
go to top