सोलापूर : येथील दमाणी नगरातील पावन गणपती मंदिराजवळ (Ganesha Temple) राहणाऱ्या ३६ वर्षीय तरुणाने मावशीच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अरुण रोडगे व शकलेश जाधव यांच्या त्रासाला कंटाळून आनंद दादाराव शिंदे याने सुसाईड नोट लिहून आत्महत्या केल्याप्रकरणी सलगर वस्ती पोलिसांत (Police) गुन्हा दाखल झाला आहे. मृताची आई अंजना शिंदे यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.