Solapur : शिधा ‘आनंदा’चा, पदरी मात्र निराशा; रेशन दुकानदारांना कमिशनची प्रतीक्षा; चार महिन्यांपासून दीड कोटी थकीत

चार महिन्यांपासून शहरातील ३१४ रेशन दुकानदारांचे सुमारे दीड कोटी रुपयांचे कमिशन शासनाकडून देण्यात आले नाही.
anandacha shida
anandacha shida sakal

सोलापूर - मोठा गाजावाजा करत दिवाळीप्रमाणे गणेशोत्सवातही आनंदचा शिधा आला. मात्र, सुरवातीला आनंदाच्या शिध्यातील जिनसाच्या गुणवत्तेवरून ग्राहकांची नाराजी रेशन दुकानदारांना पत्करावी लागली तर आता कमिशनसाठी हेलपाटे घालावे लागत आहेत. यामुळे आनंदाच्या शिध्याने आनंद कमी. मात्र, पदरी निराशा ही वास्तव परिस्थिती राहात आहे.

चार महिन्यांपासून शहरातील ३१४ रेशन दुकानदारांचे सुमारे दीड कोटी रुपयांचे कमिशन शासनाकडून देण्यात आले नाही. त्यामुळे सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांच्या घरात आनंदाचा शिधा देणाऱ्या रेशन दुकानदारांना आता आपली व्यथा कुणापुढे मांडावी असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सोलापूर शहरात ३१४ रास्त दुकानदार आहेत. तर जिल्ह्यात सुमारे एक हजार दोनशे रेशन दुकानदार आहेत. या रेशन दुकानदारांकडून प्राधान्यक्रमातील लाभार्थ्यांना दरमहा वेळेत धान्य देण्याचे काम होत आहे. याशिवाय राज्य व

केंद्र शासनाकडून वेळोवेळी देण्यात येणारा आनंदाचा शिधा लाभार्थ्यांना वितरित करण्याची जबाबदारी या रेशन दुकानदारांवर आहे. रेशन व्यवस्थेत केंद्र व राज्य शासनाकडून ऑनलाइन प्रणाली रेशन

anandacha shida
Solapur : टेंभू योजेनेचा कॅनॉल फुटून लाखो लिटर पाणी वाया; सांगोला तालुक्यातील पाचेगाव बुद्रुक येथील घटना; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

दुकानदारांचे कमिशन वेळेत देण्याचे आदेश अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सहसचिव तातोबा कोळेकर यांनी राज्यातील

सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी व अन्न धान्य वितरण अधिकारी यांना दिले आहेत, असे

असतानाही या आदेशाचे पालन प्रशासकीय यंत्रणेकडून होत नसल्याचे दिसून येत आहे.

काही दुकानदारांची चलाखी

रेशन दुकानात रेशनच्या धान्याबरोबरच चहा, वॉशिंग पावडर, तूर डाळ आदी १८ प्रकारचे धान्ये, कडधान्य, ३१ प्रकारचे तादुंळ विक्री करण्याची परवानगी आहे. मात्र, रेशन घेण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांची गरज व पसंतीनुसार त्यांनी ते विकत घ्यायचे आहेत. मात्र शहरातील अनेक दुकानदारांकडून या वस्तू खरेदीसाठी जबरदस्ती करण्यात येत आहे, अशी तक्रार अनेक ग्राहकांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली.

anandacha shida
Solapur : पोटचा गोळा गेल्याचं डोंगराएवढं दु:ख आवरून मुलाचे नेत्रदान

काही दुकानदारांची चलाखी

रेशन दुकानात रेशनच्या धान्याबरोबरच चहा, वॉशिंग पावडर, तूर डाळ आदी १८ प्रकारचे धान्ये, कडधान्य, ३१ प्रकारचे तादुंळ विक्री करण्याची परवानगी आहे. मात्र, रेशन घेण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांची गरज व पसंतीनुसार त्यांनी ते विकत घ्यायचे आहेत. मात्र शहरातील अनेक दुकानदारांकडून या वस्तू खरेदीसाठी जबरदस्ती करण्यात येत आहे, अशी तक्रार अनेक ग्राहकांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली.

सोलापूर शहरातील ३१४ रेशन दुकानदारांचे जून महिन्यातील ३६ लाख २५ हजार, जुलै महिन्यातील ३७ लाख ५६ हजार, ऑगस्ट महिन्यातील ३७ लाख ३७ हजार, सप्टेंबर महिन्यातील ३७ लाख ९७ हजार रुपयांचे कमिशन मिळणे प्रलंबित राहिले आहे.

नितीन पेंटर, सचिव; राष्ट्रीय रेशन दुकानदार संघटना

anandacha shida
Solapur : आरक्षणासाठी आत्महत्या करू नका; पोरचं मेली तर आरक्षण घेवून करायचं काय - मनोज जरांगे पाटील

जुनपर्यंतचे कमिशन दोन दिवसांत जमा होणार आहे. जुलैपासून शासनाच्या निर्दशानुसार एसएनए प्रणाली सुरू करण्यात येत आहे. त्यासाठी रेशन दुकानदारांचे खाते राष्ट्रीयकृत बॅंकेत असणे आवश्यक आहे. सध्या अनेक दुकानदारांची खाती सहकारी बॅंकेत आहेत. याबाबतचे पत्र देण्यात आले असून नवीन खाते क्रमांकाची मागणी करण्या आलेली आहे.

सुमित शिंदे, अन्न धान्य वितरण अधिकारी, सोलापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com