सहाय्यक पोलिस निरीक्षक कोल्हाळ अखेर निलंबित; आयुक्तांचे आदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सहाय्यक पोलिस निरीक्षक कोल्हाळ अखेर निलंबित; आयुक्तांचे आदेश

सहाय्यक पोलिस निरीक्षक कोल्हाळ अखेर निलंबित; आयुक्तांचे आदेश

सोलापूर : नागेश बारवरील छापा प्रकरणात सीसीटीव्ही फुटेजचा डीव्हीआर ताब्यात घेऊन जप्त न करणे व इतर कारणासाठी विजापूर नाका पोलिस ठाण्याचे डीबीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शितलकुमार कोल्हाळ यांना निलंबित करण्याचे आदेश पोलिस आयुक्त हरिष बैजल यांनी दिले आहेत. ता. २९ ऑक्‍टोबर रोजी सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या मार्फत विजापूर नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नागेश बारवर छापा टाकला. तेव्हा तेथे पोलिसांनी १२ नृत्यका व २० पुरुषांना ताब्यात घेत रोख रक्कम, मोबाइल हॅंडसेट, चारचाकी वाहने व दुचाकी वाहने असा एकूण ४९ लाख ५८ हजार १०० रुपयांचा ऐवज जप्त केला होता.

या प्रकरणात सहायक पोलिस आयुक्तांनी इतर पळून गेलेले आरोपी निष्पन्न करण्याच्या दृष्टीने डीव्हीआर (ज्यात सीसीटीव्ही फुटेज पाहता येते) हे जप्त का केले नाही अशी विचारणा कोल्हाळ केली. तेव्हा सहाय्यक पोलिस निरीक्षक शितलकुमार कोल्हाळ यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. छाप्याच्या ठिकाणी सहायक पोलिस आयुक्तांना कोल्हाळ यांनी डीव्हीआर ताब्यात घेतल्याचे सांगूनही प्रत्यक्षात डीव्हीआर जप्त केला नाही. दरम्यान, त्यानंतर ता. १२ नोव्हेंबर रोजी सहायक पोलिस आयुक्तांचा फोन उचलला नाही. त्यानंतर कोणासही न सांगता ते वैद्यकीय रजेवर निघून गेले.

आदेशित केल्यानंतर कोल्हाळ यांनी गुन्ह्यातील सर्वात मोठा पुरावा असलेला डीव्हीआर ताब्यात घेऊनही जप्त केला नाही. फरारी २५ ते ३० आरोपींना फायदा व्हावा या उद्देशाने जाणीवपूर्वक तपासात उणिवा ठेवल्या. तसेच स्टेशन डायरीत नोंद करून ते वैद्यकीय रजेवर निघून गेले. या कारणावरून ही कारवाई करण्यात आली आहे.

loading image
go to top