How will B-2 land regularization benefit Solapur?
esakal
-विठ्ठल सुतार
सोलापूर : शहरातील लाखो-कोटी रुपयांच्या किमतीच्या वर्ग-दोन (बी-टू) सत्ताप्रकारातील जमिनी नाममात्र दोन ते पाच हजार रुपयांत नियमित करण्याचा मार्ग शासन निर्णयामुळे मोकळा झाला आहे. या निर्णयाचा लाभ १३ चाळी, २१ गृहनिर्माण सोसायट्या आणि एक हजारहून अधिक वैयक्तिक मिळकतदारांना होणार (Maharashtra B-2 land redevelopment policy) आहे. शहरातील सुमारे ८० एकर जागेवरील पुनर्विकासाला गती मिळणार आहे. त्यामुळे रेल्वे स्टेशन, बसस्थानक व इतर मोक्याच्या भागातील जुन्या इमारतींच्या जागी बहुमजली इमारती उभारण्याचा मार्ग सुकर होऊन सोलापूरच्या रिअल इस्टेट क्षेत्राला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.