esakal | Solapur: निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण - संजय केळकर
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची सभा

सोलापूर : निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण - संजय चेळेकर

sakal_logo
By
संतोष सिरसट -सकाळ वृत्तसेवा

उत्तर सोलापूर : सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या मागील निवडणुकीत सभासदांना जी-जी आश्वासने दिली. त्या आश्वासनांची १०० टक्के पूर्तता केली असल्याचे मत पतसंस्थेचे अध्यक्ष संजय चेळेकर यांनी व्यक्त केले.

सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची वार्षिक साधारण सभा नुकतीच झाली. त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे माजी राज्याध्यक्ष तथा संस्थेचे मार्गदर्शक बाळासाहेब काळे व उपस्थित सर्व संचालकांचे हस्ते प्रतिमापूजन व दिप प्रज्वलन करण्यात आले.

हेही वाचा: मुख्यमंत्र्यांचा वचक नाही का?

सभासदांना येत्या १ ऑक्‍टोबरला १० टक्के लाभांश त्यांच्या पगारी खात्यावर जमा करण्यात येईल. सर्वसाधारण कर्जमर्यादा एक लाख रुपयाने वाढवून १२ लाख रुपये करण्यात आली. सभासद पाल्यांमधून पाचवी व आठवी शिष्यवृत्ती तसेच दहावी व बारावीमधील गुणवंत विद्यार्थी यांना सन्मानित करण्यात येणार आहे. संस्थेचा वार्षिक अहवालाच्या माध्यमातून सभासदासमोर वार्षिक हिशोब सादर केला असल्याची माहिती व संस्थेकडून दिल्या जाणाऱ्या जिल्ह्यातील आदर्श शिक्षक व आदर्श शाळा पुरस्काराची नावे यावेळी जाहीर केली.

संस्थेच्या मयत सभासदाचे कर्ज माफ होण्यासाठी व त्यांच्या वारसांना अधिकाधिक आर्थिक मदत देण्यासाठी व सभासदांच्या सोयीसाठी कायमठेव तारण व शैक्षणिक कर्जाचे परतफेड हप्त्यांची संख्या वाढविणे बाबतचे पोटनियम दुरुस्ती आजच्या सभेसमोर ठेवण्यात आली असून त्यास मान्यता देण्याविषयी यावेळी सांगितले. विषयपत्रिकेवरील सर्व विषयांचे वाचन संस्थेचे चिटणीस उमाकांत घाडगे यांनी केले. संचालक मंडळाने केलेल्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करून ऑनलाइन उपस्थित सभासदांनी विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना टाळयांच्या गजरात मंजुरी दिली.

हेही वाचा: ‘पीएमपी’मध्ये आता ई कॅबही!

यावेळी संस्थेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब काळे व संचालक मच्छिंद्रनाथ मोरे यांनीही मनोगत व्यक्त केले. सभेस संस्थेचे उपाध्यक्ष आबासाहेब जाधवर, संचालक विरभद्र यादवाड, मच्छिंद्रनाथ मोरे, शिवानंद भरले, आप्पासाहेब देशमुख, उत्तमराव जमदाडे, दादाराजे देशमुख, केशवराव घोडके, विठ्ठलराव काळे, महादेव जठार, हनुमंत सरडे, बाळासाहेब गोरे, बब्रुवाहन काशीद, राम इंगळे, सभाजी फुले, सविता गाडे, मिनाक्षी बाबर, तज्ञ संचालक एजाज शेख, अंबण्णा तेलुणगी आदी उपस्थित होते. संचालक विठ्ठल काळे यांनी आभार मानले.

loading image
go to top