Solapur हुन्नूर मध्ये भंडाऱ्यात न्हाहली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Solapur

गुरूदेव शिष्याच्या पालखीची भेट

Solapur : हुन्नूर मध्ये भंडाऱ्यात न्हाहली

भोसे : खोबरे, लोकर, खारीक आदीची गुरु शिष्याच्या पालखीवर उधळण करीत बिरोबाच्या व महालिंगरायाच्या नावाने चांगभलं या जयघोषाने भंडाऱ्या मध्ये भाविक न्हाउन 20 हजार भाविकांच्या साक्षीने टाळ्याच्या कडकडाटात हुन्नर ता मंगळवेढा येथील भेटीच्या मैदानावर गुरु-शिष्याचा भेट सोहळा पार पडला हुन्नूर येथील श्री बिरोबा हे हुलजंती येथील महिलिंगरायाचे गुरु असून 17 व्या शतकापासून आजपर्यत अखंडितपणे दरवर्षी आश्विन वद्य सप्तमीला

हजारो भाविक कर्नाटक व महाराष्ट्रातून हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी हजेरी लावून भंडाऱ्यामध्ये न्हाऊन निघतात.सालाबाद प्रमाणे यंदाही पहाटेच हुलजंती येथून शेकडो भाविक धावत पळत शिष्य महालिंगरायाची पालखी घेऊन आले सकाळी महालिंगरायाची पालखी गावाशेजारील ओढ्यात विसावल्यानंतर हजारो भाविकानी महालिंगरायाच्या पालखीचे दर्शन घेतले.दु.3 वाजता हुन्नूर गावाच्या पश्चिमेकडील बिरोबा मंदिरातून गुरु बिरोबाची पालखी ढोल ताश्याच्या गजरात वाजत गाजत

हुन्नूर गावातील भेटीच्या मैदानावर आल्यानंतर ओढ्यातून शिष्य महालिंगरायाची पालखी भेटीच्या मैदानावर आल्यानंतर सर्वप्रथम गुरु शिष्य पालखी समोरील बैलाची भेट झाली व नंतर सायंकाळी 4 वाजतां हजारो भाविकांच्या साक्षीने टाळ्याच्या कडकडाटात मुक्तपणे भंडाऱ्यात न्हाऊन निघत हा नयनरम्य भेट सोहळा पार पडला.

महाराष्ट्र व कर्नाटकातील हजारो भाविकांनी गर्दी केली.परंतु सकाळपासून पावसाने हजेरी लावल्याने भेटीच्या दरम्यान भाविकांची गर्दी कमी होईल असा अंदाज असतानाच बरोबर भेटीच्या वेळी पावसाने उघडीप दिल्याने हा भेटीचा सोहळा पार पडला.

भेटीनंतर गुरु शिष्य पालख्या वाजत गाजत हजारो भाविकासमवेत हुन्नूर येथील बिरोबा मंदिरात जाऊन विसावल्या या भेट सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे बिरोबा मंदिरात होणारी घोंगडे पांघरलेल्या पूजाऱ्याकडून होणारी भाकणूक ऐकण्यासाठी कर्नाटक व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी एकच गर्दी केली होती.यात्रेत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मंगळवेढयाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी

राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली

पो. नि. रणजित माने व त्यांच्या सहकाऱ्यानी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला. यात्रेत होणारी भाविकांची गर्दी व वहानावर नियंत्रण ठेवण्यासाठी पो.नि. रणजित माने हे स्वता भाविकांना अवाहन करीत होते.