शेजाऱ्याचं पाणी आलं दारात; मारहाण करत महिलेचा विनयभंग

पाण्याची टाकी साफ करताना शेजाऱ्याचे घाण पाणी आपल्या दारात आल्यामुळे महिलेला मारहाण करण्यात आली आहे.
crime news
crime newssakal
Updated on

सोलापूर : पाण्याची टाकी साफ करताना शेजाऱ्याचे घाण पाणी आपल्या दारात आल्यामुळे सोलापूरातील करमाळ्यात एका महिलेला मारहाण करत विनयभंग करण्यात आला आहे. करमाळ्यातील सिद्धार्थनगर येथे ही घटना घडली असून याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(Solapur Crime News)

फिर्यादी महिला आपल्या घरातील पाण्याची टाकी साफ करत होती. त्यावेळी टाकीतील घाण पाणी उताराने शेजाऱ्याच्या दारात गेले तेव्हा आमच्या दारात पाणी का आले? असं म्हणत शेजाऱ्यांनी ४० वर्षाच्या महिलेला आणि तीच्या आईवडिलांना मारहाण केली. त्यावरुन सदर महिलेने आरोपींविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार गौतम कांबळे, मयूर गौतम कांबळे व दीपक कांबळे (सर्व रा. सिद्धार्थ नगर, करमाळा) या आरोपींविरुद्ध 354, 354 (ए), 324, 34, 323, 504, 506 या कलमानुसार गुन्हा दाखल झाला आहे.

crime news
मारहाण करत रिक्षाचालकाचा खून; सेल्फी काढून मित्रांना पाठवला

या घटनेतील पिडीत महिला शिक्षिका असून त्यांचे आईवडिल सेवानिवृत्त शिक्षक आहेत, गुरुवारी संध्याकाळी त्या आपल्या घरातील पाण्याची टाकी साफ करताना टाकीतून काढलेले घाण पाणी उताराने शेजाऱ्याच्या घरात गेल्यामुळे त्यांनी याचा जाब विचारत वाद घातला आणि काठी आणि दगडाने मारहाण केली. त्याचबरोबर फिर्यादी शिक्षिकेच्या आईवडिलांनाही मारहाण केली असून आरोपीने फिर्यादी महिलेच्या अंगावरील कपडे फाडून मारहाण केल्याचं फिर्यादीने पोलिस तक्रारील म्हटलं आहे.

आरोपींविरुद्ध 354, 354 (ए), 324, 34, 323, 504, 506 या कलमानुसार गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Praniti Shinde serves devotees at Machnur Siddheshwar Temple
Uttamprakash Khandare’s Stand on SC Quota
Solapur Weather Update
MSEDCL Load Shedding Hits Penur Farmers Ujani Canal Full But Power Shortage Causes Sugarcane And Other Crops To Dry
Marathi News Esakal
www.esakal.com