मारहाण करत रिक्षाचालकाचा खून; सेल्फी काढून मित्रांना पाठवला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Murder

मारहाण करत रिक्षाचालकाचा खून; सेल्फी काढून मित्रांना पाठवला

चेन्नई : चेन्नईतील मनालीमध्ये चार व्यक्तीने एका रिक्षाचालकाला बेदम मारहाण करत त्याचा खून (Murder) केला आहे. ही घटना मनालीमधील न्यू टाऊन येथे बुधवारी रात्री घडली असून खून केल्यानंतर सदर आरोपींनी मृतासोबत सेल्फी काढून त्यांच्या मित्रांना पाठवला आहे.

खून केल्यावर मृतदेहासोबत काढलेला फोटो त्यांनी आपल्या मित्रांना पाठवला होता. त्यानंतर सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल झाल्यावर पोलिसांनी गुरुवारी सकाळी आरोपींना अटक केली आहे. के रविचंद्रन (३२) असं मृत व्यक्तीचं नाव असून मदन कुमार (३१), ए धनुष (१९), के जयप्रकाश (१८) आणि एस भारत (१९) या चौघांना पोलिसांनी अटक करत त्यांना कोठडीत रवाना केलं आहे.

हेही वाचा: भारत-बांग्लादेशमध्ये उच्चस्तरीय बैठक; परराष्ट्रमंत्री म्हणाले...

काही दिवसांपूर्वी आरोपी मदन याने रविचंद्रनसोबत भांडण केलं होतं. त्यानंतर बुधवारी त्याने रविचंद्रनला मनालीतील न्यू टाऊन येथील मैदानावर दारू पार्टीसाठी बोलावलं आणि झालेल्या भांडणाचा वाद मिटवण्यासाठी सांगितलं होतं असं पोलिसांनी सांगितलं. काही काळानंतर त्याच्या नातेवाईकांनी रविचंद्रनला संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण त्याचा फोन बंद झाला होता.

पत्नी किर्थाना आणि नातेवाईकांनी त्याची शोधाशोध सुरु केली. शोधत शोधत वेत्रीनगर येथील मैदानावर पोहचल्यावर चार मित्र रविचंद्रनच्या मृतदेहासोबत फोटो काढताना नातेवाईकांना दिसले होते. घटनास्थळी नातेवाईक पोहोचल्यावर आरोपींनी पलायन केल्याचं पोलिसांनी सांगितलं.

हेही वाचा: पाकला मोदींच्या काश्मीर दौऱ्याबद्दल बोलण्याचा हक्क नाही; भारताने सुनावलं

रविचंद्रनच्या मृतदेहावर जखमा आढळल्या असून दारूच्या बाटल्यांनी वार केल्याचं त्यांनी सांगितलं. सध्या मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून किर्थाना यांनी दिलेल्या तक्रारीवरुन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींना शोधण्यासाठी आणि पकडण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आलं होतं, आरोपींनी काढलेल्या सेल्फीमुळे त्यांना शोधायला मदत झाली. सदर घटनेचा पुढील तपास सुरु असल्याची माहिती अवडी पोलिस आयुक्त संदीप राय राठोड यांनी दिली.

Web Title: Chennai Four Friend Murder Take Selfie With Death Body

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :crimemurderChennai
go to top