Solapur : स्व. भालकेच्या देवीपुजनाची परंपरा भगीरथ कडून कायम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

solapur

Solapur : स्व. भालकेच्या देवीपुजनाची परंपरा भगीरथ कडून कायम

मंगळवेढा : स्व. आ. भारत भालके यांची नवरात्रात तालुक्यातील देवीची पूजा करण्याची परंपरा भगीरथ भालके व त्यांच्या पत्नी डाॅ प्रणिता भालके यांनी पुढे चालवत गेले काही महिन्यापासून बंद झालेला संपर्कचा दौरा देखील त्यांनी या निमित्ताने पुढे सुरू ठेवला.

2009 साली मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर पंढरपूर- मंगळवेढा हा नवीन मतदार संघ अस्तित्वात आला तो येण्यापूर्वी स्व. आ.भारत भालके हे तालुक्यातील सर्व शहर व ग्रामीण भागातील सर्व नवरात्र मंडळाच्या देवीची खणा नारळाने ओटी भरून पूजा करीत होते. त्यातून त्यांची राजकीय वाट सुकर झाली.

पूजेची ही परंपरा भालके यांनी त्यांच्या तीन वेगवेगळ्या पक्षातील आमदारकीच्या काळात 11 वर्षे कायम ठेवली. त्यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत पुत्र भगीरथ भालके यांचा निसटता पराभव झाला.जवळपास वर्षभराने झालेल्या विठ्ठलच्या निवडणूकीतही झालेल्या पराभवानंतर राजकीय पातळीवर त्यांच्या सहभागाबद्दल उलट सुलट चर्चा सुरू झाल्या. मात्र नवरात्र महोत्सवात पुन्हा सक्रिय होत वडिलांचा तो देवीच्या पूजेचा वारसा पुत्र भगीरथ भालके व डाॅ प्रणिता भालके यांनी कायम ठेवत शहर व ग्रामीण भागातील जवळपास 82 नवरात्र मंडळ असून पूजेच्या निमित्ताने नव्या दमाने राजकीय वाट शोधण्याचा प्रयत्न सुरू करताना लोकांशी संपर्क साधताना दिसू लागले.

त्यामुळे खुल्या वातावरणात साजरा होत असलेल्या नवरात्र महोत्सवात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग होत आहे यातून संपर्काचे पुन्हा व्यासपीठ निर्माण झाले. ग्रामीण भागात दोघा पती पत्नीला महिला, जेष्ठ व युवकाकडून त्यांना प्रतिसाद मिळत आहे.दक्षिण भागात दौऱ्यावर जात असताना भाळवणी येथे स्व भारत भालकेनी अजित जाधवच्या हॉटेलमध्ये ज्या जागेवर बसून चहा घेतला. पुजेसाठी आलेल्या भगीरथ भालकेना त्याच हॉटेलमध्ये त्याच जागेवर पुन्हा बसवून चहा पिण्याचा आग्रह करून स्व भालकेच्या आठवणींना उजाळा या निमित्ताने देण्यात आला.यावेळी विष्णू चौगुले, दत्तात्रय देवकर, बिबीषन पाटील, श्रीकांत निकम, धनाजी चव्हाण, विजय जाधव,तात्या काटकर,काका डोंगरे, आदी उपस्थित होते