सोलापूर : बंद भोसे पाणी योजना सुरू करण्याचे नियोजन कागदावर,पाण्यासाठी भटकंती सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भोसे पाणी योजना सुरू करण्याचे नियोजन

सोलापूर : बंद भोसे पाणी योजना सुरू करण्याचे नियोजन कागदावर,पाण्यासाठी भटकंती सुरू

मंगळवेढा : आ. समाधान आवताडेच्या गावभेट दौय्रात दक्षिण भागातील अनेक गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मांडला जात असताना या भागासाठी असलेल्या भोसे प्रादेशीक पाणी पुरवठा योजनेतील थकीत 38 लाख  थकबाकी असून यातील 22 गावांनी पाणीपट्टीचा एक रुपया देखील भरला नाही त्यामुळे कडक उन्हाळयात देखील योजना सुरु होण्यावर सभ्रंम असल्याने या गावातील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरु आहे.उन्हाळा संपत आला तरी योजना सुरु करण्याचे नियोजन कागदावर राहिले

गेल्या दोन वर्षापासून या योजनेला वीज थकबाकीवरुन घरघर लागली असून ही योजना महाराष्ट्र जीवन प्राधीकरण कडून हस्तातरीत होताना 68 लाख इतके वीज बिल थकीत होते मात्र यावर योग्य तोडगा न काढता योजना हस्तातरीत केली.मात्र मोठया थकीत रकमेची तरतूद जि प ने केली नाही ग्रामपंचायतीकडील येणेबाकी 38 लाख असून महावितरणचे देणे 1 कोटी 17 असून या फरकातील रक्कमेची तरतूद कोण करणार हा प्रश्‍न अनुतरीत आहे मात्र पाणी पुरवठा विभागाच्या भोंगळ कारभारामुळे ही बंद असून योजनेची मालमत्ता बेवारस स्थतीत आहे त्यामुळे भविष्यात विजबिलाबरोबर यांत्रीक दुरस्तीसाठी देखील निधी तरतूद करावी लागणार आहे जिल्हा नियोजन मंडळामध्ये कोटयावधीचा निधी असताना ही योजना सुरु करण्यासाठी मात्र निधीची तरतूद केली नाही,त्यामुळे पाणी योजना अधिकारी व ठेकेदारासाठी असल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे सत्ताधारी राज्य सरकार व स्थानिक आमदार परस्पर विरोधी असल्याने याचा त्रास मात्र सर्वसामान्य नागरिकांना सोसावा लागत आहे.नुकताच आ समाधान आवताडे यांनी या गावाचा दौरा केला यातील बहुतांश गावातील नागरिकांनी ही योजना सुरू करण्याची मागणी केली

पाणी पटटी एक रुपया ही न भरलेली गावे व थकीत कर पुढीलप्रमाणे

खडकी 59346,मेटकरवाडी 70470,हिवरगाव 73872,डोंगरगाव 198450,लेंडवे चिंचाळे 46332,सिध्दनकेरी 48330,चांभारवस्ती (रडडे)172368,लक्ष्मी नगर (रडडे)58752,भोसे 67320,जित्ती 28512,मानेवाडी 112946,बावची 73548,चिक्कलगी 28836,गावठाण (नंदेश्‍वर)81972,भाळवणी 164430,खवे 47628,सलगर खु 6048,येळगी 51991,सोडडी 34992,जंगलगी 115020,माळेवाडी 40370,मारोळी 137030,होनमुखे वस्ती (मारोळी),39960,सलगर बु (जीएसआर)20628,आसबेवाडी 59940,शिवनगी 43222

योजना सुरु करण्याचे नियोजन कागदावर

आ समाधान आवताडे यांनी ही योजना सुरु करण्याबाबत गत महिन्यात बैठक घेत नियोजन केले मात्र त्या दिवसापासून या योजनेचे पाणी वापरलेल्याकडून पाणी पटटी भरण्यास टाळाटाळ केली वैठकीत निवडक गावांनी पाणी मिळाले नसल्याची तक्रार केली पण पाणी वापरुनही पाणी पटटी न भरणाय्रा ग्रामपंचायतीवर शासन कारवाई करणार का ? असा सवाल विचारला जात असून या योजनेमुळे टॅकर व इतर पाणी योजनेचा लाभ मिळण्यास अडचणी आहे. थकीत वीजबिल भरण्याबाबत त्यांचाही मधून तरतूद करण्यासाठी प्रशासनाने पाठपुरावा करणे अपेक्षित होते तर आ.आवताडे बैठक घेवूनही प्रशासनाने ही योजना सुरु करण्याचे कागदोपत्री नियोजन करुन ग्रामीण जनतेला पाण्यासाठी त्रास देण्याचा सपाटा प्रशासनाने लावला.

Web Title: Solapur Bhose Water Scheme

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top