
Solapur Dussehra
Sakal
सोलापूर : दहा दिवस आदिमाया दुर्गाशक्ती वृत्तवैकल्याने आराधना करण्यात आली. गुरुवारी विजयादशमी दिनी सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांच्या डीजेमुक्त मिरवणुकांनी नवरात्र महोत्सवाची सांगता झाली. बलिदान चौक तुळजापूर वेस येथून सुरू झालेल्या या मिरवणुका पार्क मैदानावर शमीच्या वृक्षाभोवती सीमोल्लंघन केल्यानंतर देवीला निद्रिस्त केल्यानंतर स्थिरावल्या. सोन्याचे प्रतीक समजल्या जाणाऱ्या आपट्याची पाने लुटून एकमेकाला आलिंगन देत मोठ्या उत्साहात विजयादशमी सण साजरा करण्यात आला.