
आजीसोबत निघालेल्या सहा वर्षांच्या चिमुकल्याला दुचाकीनं धडक दिल्यानं त्याचा मृत्यू झाला. सोलापुरात गेंट्याल चौकात ही घटना घडली. दुचाकीनं धडक देताच शिवांशू हा गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं होतं पण उपचारावेळीच त्याची प्राणज्योत मालवली. शिवांशू लक्ष्मीनारायण बोद्धूल असं चिमुकल्याचं नाव आहे.