Solapur News: पुण्यातील व्यवसाय सोडून गोशाळेची उभारणी Solapur business Pune Construction Goshala | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Solapur News

Solapur News : पुण्यातील व्यवसाय सोडून गोशाळेची उभारणी

Solapur News : कंदर (ता.करमाळा) येथील प्रगतशील शेतकरी बिभीषण केदार यांनी पुण्यातील उत्तम शिकवणीचा व्यवसाय सोडून कंदरला स्वखर्चाने गोशाळेच्या माध्यमातून नैसर्गिक शेतीची कास धरली.

एकरी दहा हजार रुपयाच्या खर्चावर त्यांनी ३५ टन केळीचा उतारा मिळवला. १० खिलार गाईच्या मदतीने त्यांनी शेतीत कायापालट घडवून आणला आहे.

बिभीषण केदार हे मूळचे व्यवसायाने शिक्षक आहेत. पुण्यात त्यांनी अनेक वर्षे अध्यापनाचे कार्य केले. त्यासोबत पुण्यात कत्तलखान्यात कापण्यासाठी चोरुन नेल्या जात असलेल्या गाई पकडून त्या सुरक्षितपणे गोशाळेत पोचवण्याचे ते काम करत असत. हे काम करताना आपण स्वतःच गावी जाऊन गोपालन करण्याची त्यांनी प्रेरणा घेतली.

ठळक बाबी

पुण्याचा व्यवसाय सोडून गोशाळेचे काम

गो आधारित शेतीत केला कायापालट

रासायनिक खतांची ५ लाखाची बचत

गो उत्पादनांची निर्मिती सुरू

नैसर्गिक खतावर एकरी ३५ टनाचा

केळीचा उतारा

३० गाईचे शेतकऱ्यांना गोशेतीसाठी केले दान

शेतकऱ्याकडून मिळालेल्या भाकड गाईचा सांभाळ

गोपालन शेती विकसित झाल्यावर आता उत्पादन निर्मिती व याबाबत जनजागृती पुढील काळात करण्याचे ठरवले आहे. इतर शेतकऱ्यांना देखील नैसर्गिक शेतीचे लाभ मिळावेत असा प्रयत्न आहे.

- बिभीषण केदार, कंदर, ता. करमाळा