Solapur : मोठया आवाज गाणी लावणाय्रा टॅक्टर चालकावर गुन्हे दाखल करण्याचा इशारा सपोनि बामणे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Solapur

Solapur : मोठया आवाज गाणी लावणाय्रा टॅक्टर चालकावर गुन्हे दाखल करण्याचा इशारा सपोनि बामणे

मंगळवेढा : ऊस गळीत हंगाम सुरु झाल्याने रस्त्यावरील वाहनाची गर्दी वाढली असून ऊस वाहतूक करणाय्रा वाहनानी सुरक्षिततेच्या दृष्टीने रत्यावरुन जाताना टॅक्टर,बैलगाडी या वाहनांच्या मागील बाजूस रिप्लेक्टर लावणे बंधनकारक असून मोठया आवाज गाणी लावणाय्रा टॅक्टर चालकावर गुन्हे दाखल करण्याचा इशारा सहायक पोलीस निरीक्षक अमोल बामणे यांनी दिला.

श्री संत दामाजी साखर कारखान्यावर रस्ते सुरक्षा अभियानाअंतर्गत रिप्लेक्टर लावण्याचा कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते यावेळी अध्यक्ष शिवानंद पाटील,उपाध्यक्ष तानाजी खरात,संचालक बसवराज पाटील,सुरेश कोळेकर,महादेव लुगडे,पोलीस कॉस्टेबल महेश पोरे,सोमनाथ माने,मुख्य शेती अधिकारी कृष्णात ठवरे, कार्यालयीन अधिक्षक दगडू फटे, ई.डी.पी मॅनेजर मनोज चेळेकर, केनयार्ड सुपरवायझर प्रकाश पाटील,सुरक्षा अधिकारी लक्ष्मण बेदरे, ऊस पुरवठा वाहनाचे मालक,चालक व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना सपोनि बामणे म्हणाले की, ऊसाने भरलेल्या वाहनास पाठीमागे रिप्लेक्टर नसल्यास व पुढून वाहन येत असल्यास त्याच्या हेडलाईटमुळे मागून येणाय्रा वाहनांना अंधारात कांही दिसत नसल्याने अपघात होण्याची शक्यता जास्त असते. तसेच टॅक्टर ड्रायव्हर ऊस वाहतुक करत असताना मोठया आवाजात टेपरेकॉर्ड लावुन वेगाने वाहन चालवत असतात.त्यांना पाठीमागील वाहनांचा अंदाज येत नाही अशावेळी अपघात होवु शकतात.

म्हणून यापुढील काळात मोठया आवाजात टेपरेकॉर्ड चालु करुन वेगाने वाहन चालवणाय्रा ड्रायव्हरवर गुन्हा दाखल केला जाईल अशा इशारा ही यावेळी बोलताना दिला .रस्ते वाहतुकीचे नियमही सर्व उपस्थित वाहन चालकांना समजावुन सांगीतले यावेळी  सदर प्रसंगी ऊस वाहतूक करणाय्रा वाहनास अध्यक्ष शिवानंद पाटील,उपाध्यक्ष तानाजी खरात, संचालक बसवराज पाटील,सुरेश कोळेकर,महादेव लुगडे, महेश पोरे,सोमनाथ माने यांचे हस्ते रिप्लेक्टर लावणेत आले.मान्यवराचे स्वागत व प्रास्ताविक संचालक रेवणसिध्द लिगाडे यांनी केले.

टॅग्स :Solapurpolice casetractor