अडीच हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर सुरक्षेची भिस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

cctv

अडीच हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर सुरक्षेची भिस्त

सोलापूर : घरी कोणी नसल्यास किंवा घर बंद असल्यास हमखास चोरी होते, अशी स्थिती आहे. दुचाकी चोरीही बंद झालेली नाही. या पार्श्वभूमीवर शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढल्यास चोरी थांबतील किंवा गुन्हेगारांना सहजपणे पकडता येईल. पण, शहराची लोकसंख्या १२ लाखांहून अधिक असतानाही शहरात केवळ अडीच हजार सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. त्यामुळे अनेक गुन्ह्यांचा छडा अजूनही लागलेला नाही.

मागील साडेसहा महिन्यांत शहरातून १२५ पेक्षा अधिक दुचाकींची चोरी झाली आहे. त्यातील बऱ्याच दुचाकींचा शोध पोलिसांनी लावला आहे. पण, हा प्रकार अजूनही पूर्णत: बंद झालेला नाही. दुसरीकडे, शहरातील विविध भागातील बंद घरांमध्ये चोरी होण्याचे प्रकारही कमी झालेले नाहीत. विकास नगरातील नागरिकांनी त्यांच्या सोसायटीत चोरी झाल्यानंतर सदर बझार पोलिसांना त्या ठिकाणी रात्रीची गस्त वाढवावी किंवा पोलिसांनी तेथे रात्रगस्त सुरू करावी, याबाबतचे निवेदन दिले.

पण, अद्याप त्या निवेदनानुसार कार्यवाही झालेली नाही, हे विशेष. जुळे सोलापूर किंवा होटगी रोड, एमआयडीसी परिसरात चोरीचे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे. मनुष्यबळ कमी असल्याने आणि सातत्याने बंदोबस्ताची ड्यूटी पोलिसांना करावी लागत असल्याने एकाच पोलिस अंमलदाराकडे अनेक गुन्ह्यांचा तपास असल्याचीही स्थिती आहे.

आता दुचाकीला हँडल लॉक केलेले असूद्या किंवा घराला लोखंडी सेफ्टी दरवाजा असूद्या, चोरी होतेच, असे अनेक गुन्ह्यांतून दिसून आले आहे. त्यावर उपाय म्हणून नागरिकांनीही घरात मौल्यवान वस्तू ठेवू नयेत व पोलिसांनीही रात्रगस्त वाढवून नागरिकांना सुरक्षिततेची हमी देणे गरजेचे असल्याचे जाणकारांचे मत आहे.

Web Title: Solapur Cctv Cameras For Security

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top