
सोलापूर : शहरात बुद्ध पौर्णिमेनिमित्त बुद्धविहारात पूजन, मिरवणूक व विविध धार्मिक विधी झाले. बुद्ध पौर्णिमेनिमित्त आज सकाळपासून विविध ठिकाणी कार्यक्रम झाले. पांढऱ्या वेशात उपासकांनी घरी भगवान गौतम बुद्धांच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर बुद्ध विहारात विशेष प्रार्थना झाल्या. उपासकांनी तथागतांच्या प्रतिमेसमोर मेणबत्ती लावून वंदनेत सहभाग घेतला. त्यानंतर शहरातून जग मे बुद्ध का नाम है, यही भारत की शान है ..जय भीम... असा जयघोष करत भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने मिरवणूक काढण्यात आली.