
सोलापूर : चेन्नई एक्स्प्रेसला मिळाला विजेवर धावण्याचा प्रथम मान
सोलापूर : मिरज रेल्वे स्थानकावरून कोयना एक्स्प्रेस व महालक्ष्मी एक्स्प्रेस विजेवर धावणार, अशी चर्चा मागील काही महिन्यांपासून सुरू होती. मात्र पुणे विभागात दौंड ते पुणे दरम्यान पाटस ते केडगाव या मार्गावर ब्लॉकच्या कामामुळे काही गाड्यांच्या मार्गांमध्ये बदल करण्यात आला आहे. त्यामुळे चेन्नई ते लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) विजेवर धावली असल्याने या मार्गावरून चेन्नई एक्स्प्रेसला पहिला मान मिळाला आहे.
गाडी क्रमांक १२१६३-१२१६४ लोकमान्य टिळक टर्मिनस- चेन्नई एक्स्प्रेस कुर्डुवाडी, पंढरपूर, मिरज मार्गे पुण्याकडे सोडण्यात आली. यावेळी रेल्वे प्रवासी सेना, रेल्वे प्रवासी संस्था व रेल्वे सल्लागार समिती सदस्य यांनी गाडीचे स्वागत केले. मिरजेतून पुण्याच्या दिशेने विजेवर धावणारी पहिलीच गाडी म्हणून चेन्नई एक्स्प्रेसला मान मिळाला. त्यामुळे इलेक्ट्रिक लोको पायलट जी. एम. चव्हाण, राजीवकुमार, लोको इन्स्पेक्टर टी. सुरेश यांचे रेल्वे सल्लागार समिती सदस्य किशोर भोरावत व संदीप शिंदे यांनी स्वागत केले. यावेळी स्टेशन प्रबंधक भगत उपस्थित होते.
Web Title: Solapur Chennai Express Gets First Honor Running Electricity
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..