esakal | सोलापूर : छत्रपती शिवाजी सांस्कृतिक मंडळची देखणी गणेश मूर्ती
sakal

बोलून बातमी शोधा

सोलापूर : छत्रपती शिवाजी सांस्कृतिक मंडळची देखणी गणेश मूर्ती

सोलापूर : छत्रपती शिवाजी सांस्कृतिक मंडळची देखणी गणेश मूर्ती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : शहरातील छत्रपती शिवाजी सामाजिक बहुउद्देशीय मंडळाच्या गणेशोत्सवाने केवळ उत्सव न करता सातत्याने वर्षभर रक्तदान, वृक्षारोपण, गरजूंना मदत करत आगळी कामगिरी बजावली आहे. पाच गृहनिर्माण सोसायट्यांच्या या मंडळाने समाजसेवेतून वेगळी ओळख निर्माण केली आहे. 1985 मध्ये आनंदवन सोसायटी भागातील डॉ. आंबेडकर सोसायटी, सालेश्‍वर, छत्रपती शिवाजी सोसायटी व एसटी कॉलनीतील नागरिकांनी एकत्र येऊन हे मंडळ स्थापन केले. सुधीर साळुंके, सुर्वे गुरुजी, अनंत घोगळदरे, अरविंद काकडे, श्री.विधाते, मिलिंद भोसले, मकरंद यादव आदींनी मंडळाच्या स्थापनेत पुढाकार घेतला.

सर्व सोसायटीमध्ये एकाच गणपती बसवण्याचे ठरले. त्यानुसार नागरिकांनी मंडळाचे काम सुरु केले. सर्व सोसायट्यांसाठी एकत्रितपणे कार्यक्रम सादर करण्याचे काम सुरु झाले. वृक्षारोपणाने परिसरातील रिकाम्या जागावंर झाडे लावली गेली. सर्व सोसायटीतील मुलांना उत्तेजन देण्यासाठी चित्रकला स्पर्धा, रंगभरण, नृत्य अशा अनेक स्पर्धा नियमित घेतल्या जातात. या भागातील मुलांना कायमचे व्यासपीठ मंडळामुळे उपलब्ध झाले आहे. तसेच नियमित रक्तदान शिबिराचे आयोजन देखील केले जाते.

हेही वाचा: धारावीच्या जान मोहम्मदचे 'दाऊद'शी जुने संबंध - ATS प्रमुख

कोरोना काळात मंडळाने पुढाकार घेत स्वयंप्रेरणेने मदतीची काम केली. गरजूंना अन्नदान केले. कोरोना काळात अनेक डॉक्‍टर व समाजसेवकांनी मोठ्या प्रमाणात मदत केली. त्यांना निमंत्रित करून त्यांनाही कोरोना योध्दा म्हणून पुरस्कार देण्यात आला. शैक्षणिक साहित्याचे वाटप दरवर्षी गरजू विद्यार्थ्यांना केले जाते.मंडळाने लेझीम व झांज पथकाची निर्मिती केली आहे. या पथकांच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम देखील केले जातात. मंडळात अध्यक्ष संदीप साळुंके, उपाध्यक्ष संदीप डावरे, खजिनदार श्रीशैल तेलंग, सुजय साळुंके, रोहीत राऊत यांच्यासह सदस्य सक्रीय असतात.

यावर्षी आम्ही कायमस्वरुपी फायबर मूर्ती खरेदी केली आहे. त्यामुळे नविन मूर्ती घेणे व विसर्जनाची गरज राहीलेली नाही. मंडळाने हा खर्च वाचल्याने अधिक सामाजिक कामे या बचतीतून करण्याचे ठरवले आहे.

- संदीप साळुंके, अध्यक्ष, छत्रपती शिवाजी सांस्कृतिक मंडळ, सोलापूर

loading image
go to top