Solapur : जड वाहनांसाठी दिवसा शहराचा दरवाजा बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Solapur city news

Solapur : जड वाहनांसाठी दिवसा शहराचा दरवाजा बंद

सोलापूर : सर्वाधिक रस्ते अपघातात सोलापूर राज्यात ‘टॉपटेन’मध्येच आहे. शहरातील अपघात व मृत्यूला प्रामुख्याने जड वाहतूकच कारणीभूत ठरली आहे. त्यामुळे आता जड वाहनांसबंधी पोलिस आयुक्तांनी सक्त आदेश दिले आहेत. त्यानुसार परवानगीधारक जड वाहनांना कागदपत्रे पाहून शहरात एन्ट्री दिली जाईल. इतर जड वाहनांसाठी सकाळी आठ ते रात्री नऊ वाजेपर्यंत शहरात सोडले जाणार नाही.

हेही वाचा: Solapur : दामाजी’ने एफआरपीचा शब्द पाळला : पाटील

शहरात महापालिका व स्मार्ट सिटीअंतर्गत वेगवेगळी कामे सतत सरू असल्याने डंपरची वाहतूक दिवसभर सुरू असते. त्यासाठी संबंधित यंत्रणेने पोलिस आयुक्तालयाकडून परवानगी घेतली जाते. काही दिवसांपूर्वी सिव्हिल चौकात एका शिक्षिकेचा तर शनिवारी (ता. २९) एका चिमुकल्याचा डंपरच्या धडकेत मृत्यू झाला.

हेही वाचा: Solapur : रिक्षांवर उद्यापासून ‘आरटीओ’ची कारवाई

शिक्षिकेला धडक दिलेल्या डंपरचालकाकडे वाहतूक पोलिसांची परवानगी होती. तर चिमुकल्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या डंपरचा परवाना संपला होता. तुळजापूर नाका येथील वाहतूक पोलिसांनी हात करूनही तो चालक तसाच पुढे आला होता. त्याच्याविरुद्ध जोडभावी पेठ पोलिस कारवाई करीत आहेत. पण, यापुढे डंपर असो वा अन्य जड वाहनांमुळे अपघाती मृत्यू होणार नाही, यादृष्टीने पोलिस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांनी पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे यांच्या माध्यमातून वाहतूक पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सक्त सूचना केल्या आहेत.

हेही वाचा: Solapur : सोलापूरची माळराने पक्ष्यांनी गजबजली

परवानगी दिलेल्या वाहनांना अडवून त्यांच्याकडील फिटनेस प्रमाणपत्र, विमा, चालकाचा परवाना अशा कागदपत्रांची पडताळणी काटेकोरपणे करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. शहराबाहेरून बायपास रस्त्यांचे काम पूर्ण झाले तरी, शहराजवळील कारखान्यांची वाहने शहरातून ऊस वाहतूक करतात. या वाहनांवरही विशेष लक्ष ठेवले जाणार आहे.

हेही वाचा: Solapur : भीमाची पहिली उचल 2 हजार 600 रुपये राहील : खा धनंजय महाडिक

अत्यावश्यक वाहनांना दुपारी एन्ट्री

परराज्यातून सोलापूर शहरात माल घेऊन आलेल्या वाहनांना त्यांची कागदपत्रे पाहून दुपारी एक ते चार यावेळेत शहरात येण्यास परवानगी दिली जाते. पण, त्या वाहनातील संपूर्ण माल याच ठिकाणी उतरणारा असावा, अशी अट आहे. त्याशिवाय इतर जड वाहनांना रात्री नऊनंतर व सकाळी आठपूर्वीच शहरात येण्यास व बाहेर जाण्यासाठी परवानगी असणार आहे.

हेही वाचा: Solapur : संघटनेला कोणी चिल्लर समजण्याची चूक कोणी करू नये; अॅड कोमल ढोबळे-साळुंखे

पोलिस आयुक्तालयात आज बैठक

शहरात वाहनांची संख्या खूप झाली असून रस्ते अरुंद झाले आहेत. अनेक रस्त्यांलगत वेगवेगळ्या प्रकारचे अतिक्रमण झाल्याची शहरात स्थिती. स्मार्ट सिटी व महापालिकेच्या विविध कामांसाठी अनेक जड वाहनांना परवानगी; त्याचा घेतला जाणार आढावा.